TRENDING:

Aajache Rashibhavishya: श्रीरामनवमी! पैसा, प्रेम, प्रतिष्ठा सगळं मिळणार, मेष ते मीन या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: श्रीरामनवमीचा दिवस मेष ते मीन राशींसाठी खास असेल. तुमच्या नशीबात काय? ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
श्रीरामनवमी! पैसा, प्रेम, प्रतिष्ठा सगळं मिळणार, मेष ते मीन या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येत आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी यश मिळेल. तसेच आज खरेदीचा देखील योग आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. दुसऱ्याची काळजी घेत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून आज आर्थिक बाजू तुमची भक्कम असणार आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती शांततेने हाताळा.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कठीण असणार आहे. आज छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या अडचणीच्या काळात तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळणार नाही. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट मिळेल. एखाद्य काम हाती घेतल्यावर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करणार आहात. मतभेद दूर होतील. आज तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य असण्याची शक्यता आहे.
advertisement
5/13
सिंह राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणीही मदतीचा हात देणार नाही. त्यामुळे कोणाकडून अपेक्षा न करता मनापासून फोकसने काम करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच कामाचा ताण घेऊ नका. चिडचिड होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा गुरुवार हा अनुकूल बदल घेऊन येणारा आहे. तुमच्या नक्षत्राची स्थिती चांगली असून अनुकूल घटना होताना तुम्हाला पहायला मिळतील. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. कोणाविषयी मतभेद ठेवू नका. मतभेद असतील तर ते याच्यासोबत बोलून दूर करा.
advertisement
7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यकारक ठरेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागतील. तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरीत चांगली संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. गुंतवणुकीसाठी देखील दिवस योग्य आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे कामे आज पूर्ण होतील. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी देखील आजचा दिवस योग्य आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. कामे नियोजनबद्ध करा. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस भावनिक असणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या दुःखी होऊ शकता. मनातील नकारात्मक भावना दूर करा. कोणताही निर्णय घेताना हजार वेळा विचार करा.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस जबाबदारी वाढवणारा ठरेल. कामाचा ताण जाणवेल, पण तुम्ही योग्य प्रकारे सर्व गोष्टी हाताळाल. नोकरीत बदलाची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामाने समाधानी राहतील. व्यवसायात आज चांगला फायदा होऊ शकतो. मोठा निर्णय घ्यायचा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडा सावधगिरीचा आहे. तुमच्यावर कामाचा ताण वाढेल. काही लोक तुमच्या मागे बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही वादात पडू नका. नोकरीत वरिष्ठांशी चर्चा करताना संयम ठेवा. शब्द जपून वापरा. व्यवसायात आज नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहा. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. तुम्ही करत असलेल्या कामाविषयी मनात इगो ठेवू नका. अन्यथा तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे तुम्ही वेगळ्या आणि क्रिएटीव्ह पद्धतीने पूर्ण करणार आहात.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: श्रीरामनवमी! पैसा, प्रेम, प्रतिष्ठा सगळं मिळणार, मेष ते मीन या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल