Marathi Serial : 'आदित्य'ची नव्या मालिकेत एंट्री, मग 'पारू' कुठे गेली, ती काय करतेय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial Paaru : पारू मालिकेतील आदित्य म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे नव्या मालिकेत दिसणार आहे. मग पारू म्हणजे अभिनेत्री शर्वरी सोनावणे सध्या काय करते आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल.
advertisement
1/7

मराठी मालिका </a>जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू." width="1600" height="900" /> सध्या कित्येक मराठी चॅनेल्सवर नव्या मराठी मालिकांची एंट्री आणि जुन्या मालिकांची एक्झिट सुरू आहे. जुन्या मालिका निरोप घेताना शेवटचा एपिसोड रिलीज करतात आणि तसं जाहीर करतात. पण एक मराठी मालिका जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू.
advertisement
2/7
कलर्स मराठी चॅनेलवरील ही मालिका अचानक बंद झाली. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी झी मराठीवर आलेली ही मालिका. 10 फेब्रुवारी 2026 नंतर मालिकेचा एपिसोड रिलीजच झाला नाही. मालिका संपली असा त्याचा शेवटचा एपिसोडही नाही. काही दिवसांनी या मालिकेचा शेवटचा भाग लवकर दाखवला जाणार असं सांगितलं जात होतं. पण महिना उलटून गेला तरी या मालिकेचा शेवटचा एपिसोड काही आला नाही.
advertisement
3/7
पारू मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री शरयू सोनावणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. प्रसाद आदित्यच्या तर शरयू पारूच्या भूमिकेत होती. पारू मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेत आदित्यचं पात्र साकारणारा अभिनेता प्रसाद जवादेची आता नव्या मालिकेत एंट्री झाली आहे. पारू बंद झाल्यावर त्याला महिनाभरातच दुसरी मालिका मिळाली आहे.
advertisement
4/7
या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रसाद जवादेची पहिली झलक पाहायला मिळत आहे. ज्यात तो दारूच्या नशेत स्वत:चं डोकं काचेवर आपटून घेतो. आईच्या विरहात मनातून पूर्णपणे तुटलेला, अल्कोहोलिक झालेला अशी त्याची भूमिका आहे. प्रसाद जवादेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/7
पारूच्या आदित्यला नवी मालिका मिळाली पण पारूचं काय? पारूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू काय करतेय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
advertisement
6/7
तर काही दिवसांपूर्वीच शरयूने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिने पारू मालिकेचा शेवटचा एपिसोड न दाखवता अचानक बंद का झाली, त्याचं कारण देत प्रेक्षकांची माफीही मागितली.
advertisement
7/7
तसंच शरयू "आता लवकरच भेटुयात एका नव्या रूपात, नव्या भूमिकेत. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्या सोबत राहूदे", असं म्हणाली. त्यामुळे पारू म्हणजेच शरयू आता कोणत्या नव्या मालिकेत दिसणार, कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : 'आदित्य'ची नव्या मालिकेत एंट्री, मग 'पारू' कुठे गेली, ती काय करतेय?