TRENDING:

Weather Alert: वादळी वारा अन् घामाच्या धारा, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 17 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात आज टोकाच्या हवामानाचा अनुभव येईल. उष्णतेचा पारा चढणार असून अवकाळी धाराही कोसळतील.
advertisement
1/7
Weather Alert: वादळी वारा अन् घामाच्या धारा, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 17 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दोन टोकाची हवामान स्थिती जाणवत आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट (Hot & Humid) स्थिती राहील, तर अंतर्गत भागांत (मध्य महाराष्ट्र, मराठवाडा) विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसाचा अंदाज आहे. 26 मार्च रोजीचं हवामान आणि तापमानाचं अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात हवामानाची विचित्र स्थिती जाणवत आहे. उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील वाढलेली आर्द्रता नागरिकांचा घाम काढणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र वेगळीच स्थिती राहील. ताशी 30 ते 40 किमी वेगवान वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि कोरडे राहील. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चढणार आहे. आज या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच तापमानाचा देखील कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आज पुन्हा सर्वच जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. पुणे परिसरात मेघगर्जनेसह तुरळक हलका पाऊस होईल. तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याचा वारा, विजांसह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 38 अंशांवर राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होईल. तर परभणी आणि बीडमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात हवामान कोरडे राहील. तर हिंगोलीत हलका पाऊस होईल. कमाल तापमान 39 अंशांवर राहील.
advertisement
6/7
विदर्भात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ परिसरात ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 26 मार्च रोजी या परिसरात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस होईल. नागपूरसह विदर्भात कमाल तापमान 36-40 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
7/7
दरम्यान, उष्ण व दमट स्थितीमुळे कोकणात डिहायड्रेशनचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी संकट असल्याने शेतकऱ्यांना पिकांची योग्य ते व्यवस्थापन करावे लागेल. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वादळी वारा अन् घामाच्या धारा, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 17 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल