'खानदान इतकं मोठं करेन की...' पाच मुलांचा बाप, पत्नीच्या चौथ्या डिलिव्हरीनंतर ट्रोल झाला युट्यूबर, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arman Malik : बिग बॉस ओटीटी फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
1/7

ओटीटी </a>फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे." width="1080" height="1440" /> बिग बॉस ओटीटी फेम यूट्यूबर अरमान मलिकच्या घरीच नुकतंच लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याची पहिली पत्नी पायलने चौथ्या बाळाला जन्म दिला असून अरमान पाच मुलांचा बाप बनला आहे. मात्र, सध्या अरमान मलिक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/7
सोशल मीडिया स्टार पायल मलिकने २४ मार्च रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. यामुळे मलिक कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच अरमानने असं काही विधान केलं आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
advertisement
3/7
पायल मलिकची डिलिव्हरी एखाद्या चित्रपटातील सीनपेक्षा कमी नाही. २३ मार्चला तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक घरी नसल्याने पायलने डिलिव्हरी करायला नकार दिला. यावेळी 'घरी बॅग आणायला जाते' असं खोटं सांगून पायल चक्क 'धुरंधर 2' पाहायला गेली.
advertisement
4/7
पायलने ४ तासांची फिल्म पाहिली आणि घरी येऊन शांत झोप घेतली. पहाटे ४ वाजता कृतिका घरी आल्यानंतर दोघी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि पायलची डिलिव्हरी झाली. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी पायलला १ एप्रिलची तारीख दिली होती. संपूर्ण मलिक कुटुंब मुलीसाठी आतुर असतानाच, त्यांच्या घरी गोंडस मुलगा जन्माला आला.
advertisement
5/7
बाळाच्या जन्मानंतर अरमानने एक व्हिडिओ शेअर केला, जो त्याच्यावरच उलटला आहे. यामध्ये अरमान म्हणाला, "आयुष्यात सेव्हिंग्स असो वा नसो, पण खानदान इतकं मोठं करेन की इतिहासात नाव घेतलं जाईल की याचं इतकं मोठं खानदान आहे!" अरमानचं हे बोलणं ऐकून युजर्सचा पारा चढला आहे. नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय.
advertisement
6/7
तथापि, बाळाच्या जन्मानंतर अरमानची दुसरी पत्नी आणि पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकाने बाळाचं नावही ठेवलं आहे. कृतिकाने क्षणाचाही विलंब न लावता बाळाला रुद्र हे नाव दिलं आहे. भगवान शिव यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं असून, 'रुद्र' म्हणजे सर्व संकटांना मुळापासून उपटून टाकणारा.
advertisement
7/7
अरमानच्या इतर मुलांची नावं झैद, अयान, तूबा आणि चिरायू अशी असताना, धाकट्या लेकाचं नाव हिंदू परंपरेनुसार ठेवल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'खानदान इतकं मोठं करेन की...' पाच मुलांचा बाप, पत्नीच्या चौथ्या डिलिव्हरीनंतर ट्रोल झाला युट्यूबर, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं