2 तासांत लिहिलं गीत, मिनिटांत बांधली चाल; पुण्यात रेकॉर्डिंगच्या आधी ओढावलेलं संकट, गदिमा-फडकेंच्या 'गीतरामायण'ची Untold Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Geet Ramayan Untold Story : अनेक दशके श्रोत्र्यांच्या मनाला भिडणारं गीतरामायण. गदिमा आणि सुधीर फडकेंच्या जोडीच्या अजरामर गीतांमागची खरी स्टोरी माहितीये का?
advertisement
1/8

"स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश लव रामायण गाती…" या ओळी ऐकल्या की कानात घुमतो तो स्वर्गीय सुधीर फडके (बाबूजी) यांचा आवाज आणि आठवतं ते अजरामर 'गीतरामायण'.
advertisement
2/8
ग.दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि बाबूजींच्या सुरांनी सजलेलं हे गीतरामायण आजही दशकानुदशके श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मात्र या अमर कलाकृतीच्या जन्मामागे एक थक्क करणारी आणि तितकीच भावूक गोष्ट आहे.
advertisement
3/8
गीतरामायणातील एक महत्त्वाचं गीत रेकॉर्ड करण्यासाठी पुण्यातील स्टुडिओमध्ये सगळे जमले होते. गदिमांनी गीत लिहिलं होतं आणि बाबूजींनी त्यावर चालही तयार केली होती. पण रेकॉर्डिंगच्या दिवशी अचानक एक संकट कोसळलं.
advertisement
4/8
सुधीर फडके यांचा मुलगा श्रीधर फडके प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाला. मुलाची अवस्था पाहून फडकेंना स्टुडिओला जाणं कठीण झालं होतं. मात्र त्यांच्या पत्नी ललिता बाईंनी समजूत काढत त्यांना रेकॉर्डिंगसाठी पाठवलं.
advertisement
5/8
रात्री उशिरा बाबूजी स्टुडिओत पोहोचले. सगळे त्यांची वाट पाहत होते. रेकॉर्डिंगला सुरुवात करायची तयारी झाली तेवढ्यात बाबूजींनी गाण्याचा कागद मागितला. इथेच खरी अडचण उभी राहिली. गदिमा म्हणाले, मी तो कागद तुला दिला, तर बाबूजी म्हणाले, मी तुझ्याकडेच दिला. दोघांमध्ये गोंधळ आणि वाद सुरू झाला. रेकॉर्डिंगच्या अवघ्या 2 तास आधी गीताचे शब्दच गायब झाले होते.
advertisement
6/8
या गोंधळात आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत यांनी मध्यस्थी करत गदिमांनी पुन्हा गीत लिहावं आणि बाबूजींनी त्यावर नव्याने चाल बांधावी असा तोडगा सुचवला. वेळ अत्यंत कमी होता पण या दिग्गजांनी हार मानली नाही. गदिमांनी अवघ्या काही वेळात ते गीत पुन्हा लिहिलं आणि कागद बाबूजींच्या हाती दिला. बाबूजींनीही क्षणात त्या शब्दांना सुरांची जोड दिली.
advertisement
7/8
रेकॉर्डिंग सुरू झालं. बाबूजींनी पहिली ओळ गायली आणि स्टुडिओबाहेर उभ्या असलेल्या गदिमांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्या क्षणी भारतीय संगीतविश्वात एक अजरामर कलाकृती जन्माला आली होती... "स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश लव रामायण गाती."
advertisement
8/8
आजही 'गीतरामायण' केवळ एक संगीतकृती नाही तर मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गदिमा आणि बाबूजी यांच्या जिद्दीने आणि प्रतिभेने संकटावर मात करत घडवलेली ही निर्मिती आजही प्रत्येक पिढीला भावते आणि प्रेरणा देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तासांत लिहिलं गीत, मिनिटांत बांधली चाल; पुण्यात रेकॉर्डिंगच्या आधी ओढावलेलं संकट, गदिमा-फडकेंच्या 'गीतरामायण'ची Untold Story