आज रामनवमी! शुभ दिवशी बनतोय 'गजकेसरी' योग, 4 राशींचं नशीब पालटणार; प्रभू श्रीरामांच्या कृपेने सर्व काही मिळणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
देशभरात 'श्रीराम नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून यंदाची रामनवमी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जात आहे, कारण आज चंद्र आणि गुरूच्या युतीतून अत्यंत शक्तिशाली असा 'गजकेसरी राजयोग' निर्माण झाला आहे.
advertisement
1/7

आज 26 मार्च 2026, गुरुवारी देशभरात 'श्रीराम नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून यंदाची रामनवमी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जात आहे, कारण आज चंद्र आणि गुरूच्या युतीतून अत्यंत शक्तिशाली असा 'गजकेसरी राजयोग' निर्माण झाला आहे.
advertisement
2/7
हत्तीसारखे ऐश्वर्य आणि सिंहासारखी शक्ती देणारा हा राजयोग 4 राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारा ठरणार आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या या पावन पर्वावर ग्रहांची ही स्थिती प्रगती आणि धनलाभाचे संकेत देत आहे.
advertisement
3/7
मेष - प्रगतीचा नवा अध्याय: मेष राशीत सध्या शुक्र आणि चंद्राची अनुकूल स्थिती आहे. गजकेसरी योगामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाईल आणि पदोन्नतीचे प्रबळ संकेत आहेत. प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन धनलाभ होईल.
advertisement
4/7
वृषभ - आर्थिक सुबत्ता आणि मान-सन्मान: वृषभ राशीच्या जातकांसाठी हा राजयोग संपत्तीची दारे उघडणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. भागीदारीतील व्यवसायातून मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.
advertisement
5/7
सिंह - करिअरमध्ये मोठी झेप: सिंह राशीचा स्वामी सूर्य असून, आजच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल. सरकारी कामात यश मिळेल आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत 'लकी' ठरेल.
advertisement
6/7
कन्या - बुद्धिमत्तेचे चीज आणि यश: कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक असेल. गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे तुमच्या निर्णयक्षमतेत सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील मंगल कार्ये ठरण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
7/7
अडकलेले पैसे परत मिळतील: या राजयोगाच्या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा जुने येणे बाकी असेल, तर ते या शुभ मुहूर्तावर परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक चिंता कायमची मिटू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज रामनवमी! शुभ दिवशी बनतोय 'गजकेसरी' योग, 4 राशींचं नशीब पालटणार; प्रभू श्रीरामांच्या कृपेने सर्व काही मिळणार