का बंद करताय? सगळ्यांची आवडती मराठी मालिका घेतेय निरोप, प्रेक्षकांना कोसळलं रडू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : बरोबर 2 वर्षांपूर्वी सुरू झाली ही मालिका, लोकांची आवडती होती, पण आता ती बंद होत आहे. याच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झालं आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसात काही नव्या मालिका आल्या, आणखी येत आहेत. त्यामुळे कित्येक मालिकांनी निरोप घेतला आहे आणि काही घेणार आहेत. अशीच एक मालिका जी लवकरच बंद होणार आहे.
advertisement
2/7
दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींचं लग्न आणि त्यानंतर लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल घडतात, मध्यमवर्गीय कुटुंबातील साध्या माणसांच्या आयुष्यातील चढ-उतार, लग्न, कौटुंबिक नातेसंबंध आणि भावनिक संघर्षावर आधारित ही मालिका.
advertisement
3/7
ही मालिका 18 मार्च 2024 मध्ये सुरू झाली होती. बरोबर 2 वर्षांनी ती निरोप घेत आहे. 29 मार्च 2026 चा त्याचा शेवटचा एपिसोड पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
सलग स्लॉट लीडर ठरलेली ही प्रेक्षकांची आवडती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झालं आहे.
advertisement
5/7
शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचं सेलिब्रेशन करतानाचे कलाकारांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
6/7
ही मालिका निरोप घेत असल्याचं समजताच प्रेक्षकांना रडू कोसळलं आहे. आमची आवडती मालिका, इतक्या लवकर का बंद करत आहात? असं विचारत प्रेक्षकांनी रडणारे इमोजीही टाकले आहेत.
advertisement
7/7
ही मालिका आहे 'साधी माणसं'. स्टार प्रवाहवर संध्याकाळी 6.30 वाजता लागणारी ही मालिका. ज्यात अभिनेत्री शिवानी बावकरने मीरा आणि अभिनेता आकाश नलावडेने सत्याची भूमिका साकारली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
का बंद करताय? सगळ्यांची आवडती मराठी मालिका घेतेय निरोप, प्रेक्षकांना कोसळलं रडू