Today Horoscope: श्रीरामनवमीचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Today Horoscope: गुरुवारी श्रीरामनवमीचा सण आहे. ग्रह-नक्षत्रांचे गणित पाहून दैनिक राशीभविष्य मांडले जाते. गुरुवारी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि काय टाळावे, प्रगतीच्या वाटेवर नेणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि तुमच्यासमोर अडचणी निर्माण करू शकणाऱ्या गोष्टी कोणत्या, याबद्दल दैनिक राशीभविष्य चांगलं मार्गदर्शन करेल. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेले दैनिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/12

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल, मूड चांगला असेल. आयुष्यात आज अचानक चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. काही आव्हाने समोर आली तरी तुमचा चांगला दृष्टिकोन आणि जिद्द तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. वैयक्तिक आयुष्यात मित्र आणि कुटुंबाला अधिक वेळ द्या. भावनिक नातेसंबंध जपण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. प्रेमसंबंध छान जुळल्याने जोडीदाराशी संवाद वाढेल. आरोग्याबाबत आज सतर्क राहा, किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.Lucky Number: 3Lucky Color: White
advertisement
2/12
वृषभ - आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन काही सुरुवातीचे संकेत घेऊन येईल. डोक्यातील अनेक योजना कागदावर आखू शकता आणि तुमच्या कष्टाचे फळही तुम्हाला मिळेल. टेन्शन न घेता केलेला चांगला विचार आणि संयम कोणत्याही कठीण प्रसंगाला सोपे करू शकतो. कामाच्या ठिकाणी टीमसोबत ताळमेळ आणि सहकार्य राखण्यावर भर द्यावा लागेल. कुटुंबात गोडवा वाढणारे काही प्रसंग घडतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असल्याने आज तुम्ही गुंतवणूक किंवा बचतीचा विचार करू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे, याची नव्यानं जाणीव होईल.Lucky Number: 10Lucky Color: Green
advertisement
3/12
मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा वेगळा, रंजक आणि काहीसा उत्साहानं भरलेला असेल. बोलण्यात आज कोणी तुमचा हात धरणार नाही, ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार अगदी प्रभावीपणे मांडू शकाल. काही कारणांनी नवीन लोकांना भेटण्याची आणि संपर्क वाढवण्याची संधी मिळेल, ती नक्कीच भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसायिक बाबतीत आज तुम्ही नवीन योजना आखू शकता. कामाबद्दल गंभीर राहा, तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. ध्येय गाठण्यासाठी सध्या एकाग्रतेची गरज आहे. वैयक्तिक आयुष्यात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आज बोलण्यातून शहाणपण आणि संवेदनशीलता दिसून येईल.Lucky Number: 5Lucky Color: Pink
advertisement
4/12
कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम नादखुळा असा काहीसा असू शकतो. कामासोबतच तुमची संवेदनशीलता इतरांना आकर्षित करेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल, कित्येक विषय बोलून मोकळेपणाने मांडू शकाल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचा हाच काळ असेल. एखाद्या नुकत्याच पूर्ण केलेल्या प्रकल्पाचे चांगले परिणाम मिळतील. कामात काहीतरी नवीन करून दाखवण्याची हीच वेळ आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, व्यायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करा. योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल.Lucky Number: 1Lucky Color: Sky Blue
advertisement
5/12
सिंह - आजचा दिवस खूपच भारी असा आहे. मनात जबर आत्मविश्वास असल्यानं नवीन संधींकडे जाण्यास प्रेरित करेल. मन प्रबळ असल्यानं आज तुम्ही जे काही कराल, त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. टेन्शन कमी होईल, मित्र आणि कुटुंबासोबतचा वेळ सुखद असेल. कामात एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर कल्पकता वापरण्याची हीच योग्य वेळ आहे. पण, आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम सुरू ठेवा.Lucky Number: 11Lucky Color: Blue
advertisement
6/12
कन्या - आजचा दिवस कन्या राशीसाठी एकमद उत्साही कडक असेल. रोजचं काम चांगले कराल, कामात कार्यक्षमता दिसेलच शिवाय नियोजन आणि आयोजन कौशल्यातही सर्वात पुढे असाल. आज तुम्हाला एखाद्या खास प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. विचारांमध्ये स्पष्टता असल्याने निर्णय घेणे सोपे जाईल. घरात काही कुरबुरी असू शकतात, कदाचित तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्टपणे मांडू शकणार नाही. बोलताना गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आणि योगासाठी वेळ काढा.Lucky Number: 3Lucky Color: Purple
advertisement
7/12
तूळ - फार काहीतरी वेगळं करायला जाऊ नका, गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी संतुलन आणि समन्वयाचे प्रतीक आहे. कामात वेगळेपण आणि लोकांशी मिळून-मिसळून राहण्याची तुमची सवय उठावदार दिसेल, लोकांशी चांगली ट्युनिंग जमेल. व्यावसायिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही नवीन कल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल, हे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आवडत्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासासाठी किंवा नवीन अनुभव घेण्यासाठी ही चांगली वेळ असून त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळेल.Lucky Number: 6Lucky Color: Brown
advertisement
8/12
वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन आला आहे. घरगुती जीवनात ताळमेळ वाढेल आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. नातेसंबंध दृढ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे, त्यामुळे तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा. आर्थिक बाबतीत सावध राहा; मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.Lucky Number: 9Lucky Color: Dark Green
advertisement
9/12
धनु - आज सतत डोक्यात नवीन काही करण्याचे विचार येतील, काम वेगवेगळ्या पद्धतीने कसे करता येईल ते जाणवेल. आत्मविश्वास वाढल्याने तुम्हाला नवीन संधी मिळतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. व्यवसाय क्षेत्रात काही नवीन शक्यता तुमच्या समोर येतील. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, यामुळे सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, त्यामुळे पावले विचारपूर्वक उचला. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे.Lucky Number: 3Lucky Color: Purple
advertisement
10/12
मकर - गुरुवारचा दिवस दमदार उत्साही असेल. जीवनातील ठरवलेल्या कामाच्या दिशेने तुम्ही खंबीर पाऊल टाकत आहात, असे तुम्हाला वाटेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही बनवलेल्या योजना प्रत्यक्षात येताना दिसतील, त्यामुळे आत्मविश्वास ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. जुन्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे संबंध सुधारतील. कौटुंबिक बाबींमध्ये सामंजस्य आणि संयम दाखवणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले वाटेल.Lucky Number: 12Lucky Color: Black
advertisement
11/12
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस विशेष आहे. कामात आज नावीन्य जाणवेल. आतापर्यंतच्या कष्टाचे सादरीकरण आणि त्यातील नवीन कल्पना शेअर करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. मित्र आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. इतरांच्या मतांचा आदर केल्यास तुमचे यश नक्कीच वाढेल.Lucky Number: 7Lucky Color: Magenta
advertisement
12/12
मीन - आज तुमच्यासाठी मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्याची आणि त्या व्यक्त करण्याची संधी मिळेल. आसपासच्या लोकांशी संवाद साधा आणि तुमच्या चिंता त्यांच्याशी शेअर करा; यामुळे बरे वाटेल, मनावरील ताण कमी होईस. आजकाल ताण वाढू न देणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा कल्पनांचे स्वागत होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास उशीर करू नका. आर्थिक बाबतीत सावध राहा, कारण खर्च वाढू शकतात. खर्चाचे नियोजन करून अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यासाठी थोडी विश्रांती घ्या, योग करणे फायद्याचे ठरेल.Lucky Number: 15Lucky Color: Orange
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Horoscope: श्रीरामनवमीचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य