Cleaning Tips : कमोड आपोआप होत राहील स्वच्छ, दुर्गंधीही येणार नाही! फक्त टॉयलेटमध्ये टाका 'ही' वस्तू..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
DIY toilet cleaner : टॉयलेट कायम स्वच्छ ठेवणं नेहमीच शक्य होतं असं नाही. प्रत्येकवेळी आपल्याला एवढा वेळ मिळत नाही की, टॉयलेट रोज स्वच्छ करता येतील. म्हणूनच काही युक्त्या वापरून आपण टॉयलेट जास्त काळासाठी न धुता स्वच्छ ठेऊ शकतो..
advertisement
1/7

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी बराच वेळ आणि मेहनत लागते. आपल्याला फारसा वेळ नसेल किंवा कामाच्या वेळा खूप बदलत असतील तर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वेळ काढणं जरा अवघड जात. अशावेळी टॉयलेट जास्त काळ फ्रेश कसं राहील याचा विचार लोक करतात.
advertisement
2/7
टॉयलेट वारंवार न धुता करता जास्तीत जास्त काळ स्वच्छ ठेवण्यासाठी काही वस्तू तुमची मदत करू शकतात. टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी टूथपेस्ट, बेकिंग सोडा, साबण, ॲल्युमिनियम फॉइल आणि एक किसणी या वस्तू लागतील. यांचा वापर कसा करायचा पाहूया.
advertisement
3/7
याचे टॉयलेट क्लिनर बनवता येते. यासाठी आधी साबण किसून घ्या. नंतर त्यामध्ये थोडी टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा टाका. हे तीनही घटक व्यवस्थित एकत्र करून एक मिश्रण बनवा. अशाप्रकारे तुमचे घरगुती टॉयलेट क्लिनर तयार होईल.
advertisement
4/7
यानंतर तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवा. प्रत्येक गोळा ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा. त्यानंतर या फॉइलच्या गोळ्याला टाचपिनच्या साहाय्याने लहान छिद्रे पाडा.
advertisement
5/7
या छिद्रांमुळे फॉईलच्या गोळ्यांमधील क्लिनर हळूहळू बाहेर येत राहाते. आता हे गोळे फ्लश टँकमध्ये टाका. यामुळं प्रत्येक वेळी फ्लश केल्यावर पाण्यासोबत थोडे क्लिनर बाहेर येईल आणि कमोड आपोआप स्वच्छ होईल, दुर्गंधीही कमी होईल.
advertisement
6/7
तुम्हाला जास्त काळ टॉयलेट स्वच्छ ठेवायला जमत नसेल तर तुम्ही टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी ही युक्ती वापरू शकता. याने तुमचं टॉयलेट स्वच्छही राहील आणि दुर्गंधीही येणार नाही.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Tips : कमोड आपोआप होत राहील स्वच्छ, दुर्गंधीही येणार नाही! फक्त टॉयलेटमध्ये टाका 'ही' वस्तू..