TRENDING:

Tourism : मालदीवच सौंदर्य भारताच्या 'या' बेटांपुढे पडेल फिकं, काय आहेत येथील टूर पॅकेजेस?

Last Updated:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारताच्या लक्षद्वीप बेटांना भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील काही सुंदर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. परंतु यावरून मालदीवच्या काही नेत्यांनी भारताची खिल्ली उडवून देशाबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं. त्यानंतर अनेक भारतीयांनी याविषयी नाराजी व्यक्त करत असून बॉयकॉट मालदीव असा ट्रेंड सुरु केला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटीज देखील भारतातील सुंदर बेट आणि त्यावरील समुद्र किनाऱ्यांना प्रमोट करताना दिसत आहेत. भारतात अशी अनेक ठिकाण आहे ज्यांच्यापुढे मालदीवचे सौंदर्य फिके पडेल, तेव्हा अशी पर्यटनस्थळ आणि तेथील टूर पॅकेजेस विषयी जाणून घ्या.
advertisement
1/5
मालदीवच सौंदर्य भारताच्या 'या' बेटांपुढे पडेल फिकं, काय आहेत येथील टूर पॅकेजेस?
लक्षद्वीप हा भारताच्या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशांपैकी एक असून भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरून 200 ते 440 मीटर दूर आहे. याठिकाणी 36 लहान मोठे बेट असून हे ठिकाण खजूर, नारळाची झाड आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखली जातात. लक्षद्वीपमधील 36 बेटांपैकी 6 बेटांवर फक्त भारतीय पर्यटकांना तर 2 बेटांवर परदेशी पर्यटकांना येण्याची परवानगी आहे. लक्षद्वीप बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 30 हजारांपासून सुरु होतात.
advertisement
2/5
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा एकूण 571 बेटांनी मिळून बनलेला आहे. हे बेट भारतीय केंद्रशासित प्रदेश असून भारताच्या आग्नेय भागास आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. या बेटांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर आणि मे दरम्यान मानली जाते, कारण याकाळात येथील हवामान आनंददायी असते. हे ठिकाण पर्यटन, जलक्रीडा आणि समुद्रकिनारी सहलीसाठी योग्य आहे. अंदमान आणि निकोबार बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 40 हजारांपासून सुरु होतात.
advertisement
3/5
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा सागरी पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. येथे पाहण्यासाठी अनेक ऐतिहासिक किल्ले, वास्तू असून येथील समुद्रकिनारे निळ्या पाण्यासाठी आणि जलक्रीडेसाठी प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्यासाठी तुम्ही हवाई मार्ग, जलमार्ग तसेच रस्तेमार्गाचा देखील वापर करू शकता. सिंधुदुर्गाचे टूर पॅकेज साधारणपणे 10 हजारांपासून सुरु होतात.
advertisement
4/5
मुनरो बेट हे केरळमधील कोल्लमपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. मुनरो हे बेट 8 बेटांनी मिळून तयार झाले असून हे ठिकाण तेथील ऐतिहासिक ठिकाण आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुनरो बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 30 हजारांपासून सुरु होतात.
advertisement
5/5
हिवलॉक बेट हे हनीमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. हिवलॉक बेट हे पोर्ट ब्लेअर पासून 55 किलोमीटर अंतरावर असून येथील खास पर्यटनस्थळांमध्ये पांढरी वाळू असणाऱ्या राधा नगर बीचचा एलिफंट बीचचा समावेश आहे. तसेच येथील सीफूड पर्यटकांना जास्त आवडते. हिवलॉक बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 30 हजारांपासून सुरु होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tourism : मालदीवच सौंदर्य भारताच्या 'या' बेटांपुढे पडेल फिकं, काय आहेत येथील टूर पॅकेजेस?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल