नागपूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ‘या’ सुंदर ठिकाणाला द्या आवश्य भेट PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
नागपूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर अंबाझरी तलावाला भेट देऊ शकता.
advertisement
1/6

फिरायला जायला अनेकांना आवडतं. जर तुम्ही <a href="https://news18marathi.com/nagpur/">नागपूरला</a> फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर अंबाझरी तलावाला भेट देऊ शकता. याठिकाणी ‘ओव्हर फ्लो पॉईंट’वर 51 फूट उंच विवेकानंद स्मारक उभारण्यात आलेले आहे.
advertisement
2/6
अंबाझरी तलावाच्या परिसरात हिरवाईने नटलेला परिसर, उत्तम प्रकाश योजना आणि I Love My Nagpur चा सेल्फी पॉईंट हे एक आकर्षणाचे केंद्र आहे.
advertisement
3/6
अंबाझरी तलाव 146 वर्षे जुना असून हेरिटेज श्रेणी ‘अ’ मध्ये तो समाविष्ट करण्यात आला आहे. अंबाझरी ओव्हर फ्लो पॉइंट जवळूनच नागपूर मेट्रो जात असल्याने नागपूर मेट्रोच्या पिल्लरवर उडत्या बगळ्यांची आकर्षक सजावट केली आहे.
advertisement
4/6
कन्याकुमारीच्या धर्तीवर नागपुरात 51 फूट उंच विवेकानंद स्मारक उभारण्यात आले असून या स्मारकाच्या खालील भागात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चित्रावर आधारित गॅलरी तयार करण्यात आली आहे.
advertisement
5/6
नागपूर महानगर पालिकेच्या पुढाकाराने नागनदीचे सध्याचा उगमस्थान अंबाझरी तलावाच्या ओव्हर फ्लो पॉईंट उभारण्यात आला असून नागपुरातील हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. येथून सूर्यास्त बघता यावा म्हणून पुतळ्याच्या मागील भागात चबुतरा बांधण्यात आला आहे.
advertisement
6/6
स्मारकाच्या खालचा भागात चारही बाजूंनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित काही प्रसंग म्युरल स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
नागपूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ‘या’ सुंदर ठिकाणाला द्या आवश्य भेट PHOTOS