TRENDING:

PHOTOS : याठिकाणी या आणि बर्फाच्या तलावावर करा स्केटिंग, नेमका काय आहे हा प्रकार?

Last Updated:
हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन राज्य आहे. उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये याठिकाणी लाखो पर्यटक येथे येतात. तसेच विविध साहसी खेळांचा आनंद घेतात. आता पर्यटकांसाठी येथे आइस स्केटिंगही होत आहे. विशेष म्हणजे हे स्केटिंग गोठलेल्या बर्फावर होत आहे. (कपिल, प्रतिनिधी)
advertisement
1/5
PHOTOS : याठिकाणी या आणि बर्फाच्या तलावावर करा स्केटिंग, नेमका काय आहे हा प्रकार
हिमाचल प्रदेश म्हणजे दऱ्या, सुंदर धबधबे, तलाव, दुर्गम नागमार्ग आणि खोल दरी असलेले सुंदर असे राज्य आहे. इथले प्रत्येक गाव आणि शहरात एक अनोखे नैसर्गिक सौंदर्य आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सुंदर आठवणी घेऊन जातात.
advertisement
2/5
शिमल्यापासून दूर असलेले सिस्सू हे गाव. हे दुर्गम लाहौल खोऱ्यात वसलेले आहे. हे त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. हे गाव हिमाचल प्रदेशातील चंद्रा जलमार्गाच्या काठावर आहे. मनालीपासून या गावाचे अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे.
advertisement
3/5
लाहौल स्पिती या आदिवासी जिल्ह्याच्या सिस्सू तलावात आईस स्केटिंग सुरू करण्यात आले आहे. येथे प्रथमच प्रशिक्षण शिबिर आयोजित करून स्केटिंग शिकविण्यात आले. हे शिबिर तीन दिवस चालले. हिमाचल प्रदेश आइस स्केटिंग असोसिएशन आणि जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी स्केटिंग सुरू केले आहे. जास्त बर्फवृष्टीमुळे याठिकाणी जाणे धोक्याचे असते.
advertisement
4/5
लाहौल स्पिती आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय दुर्गम पण सुंदर आहे. सिस्सू लेक पाहण्यासारखे आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे ठिकाण मनाला वेगळीच शांती प्रदान करते. संपूर्ण हिमाचलमध्ये बर्फवृष्टी होत आहे. पण या भागात एवढी बर्फवृष्टी होते की, सिस्सू गावासह संपूर्ण लाहोल खोरे जगापासून तुटते.
advertisement
5/5
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये येथील पर्यटन हंगाम शिखरावर असतो. त्यामुळे पर्यटन विभागाने आइस स्केटिंग सुरू केले. अशा कार्यक्रमामुळे लाहौलमधील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक मुलांना साहसी खेळांसोबतच नवीन अनुभव मिळेल, असे लाहौल स्पितीचे उपायुक्त राहुल कुमार यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
PHOTOS : याठिकाणी या आणि बर्फाच्या तलावावर करा स्केटिंग, नेमका काय आहे हा प्रकार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल