विमानप्रवास फक्त 99 रुपयांत! आता आकाशात उडायचं स्वप्न दूर नाही, Details एका क्लिकवर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आकाशात मोठ्यानं आवाज करत उडणारं छोटंसं विमान पाहिलं की, खेड्यापाड्यातल्या, शहरांमधल्या सर्वांच्या नजरा आकाशाकडं जातात. आपण कधी विमानात बसू? आपण कधीतरी विमानात बसू का? विमानात बसून जायचं कुठं? अशी असंख्य स्वप्न आणि विमानात बसल्यावर कसं वाटत असेल? तिथून जमीन कशी दिसत असेल? असे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात. अशाच सर्वसामान्यांना आयुष्यात एकदातरी विमानात बसता यावं म्हणून एक खास योजना आखण्यात आलीये. (वसीम अहमद, प्रतिनिधी / अलिगढ)
advertisement
1/5

देशात पहिल्यांदा फक्त 99 रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे. आजकाल 99 रुपयांना चीज सॅन्डविचही मिळत नाही, त्यात विमान प्रवास कसला होतोय? असा विचार मनात येणं साहजिक आहे. मात्र ही योजना खरी आहे.
advertisement
2/5
केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना विमानात बसण्याची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी 5-5 सीट्स आरक्षित ठेवण्यात येतील.
advertisement
3/5
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवाशांना विमान प्रवासाची संधी मिळेल. अर्थात खर्च कमी असल्यानं फार दूर जाता येणार नाही. ही योजना प्रवाशांना फक्त विमानात फिरताना कसं वाटतं हा अनुभव देण्यासाठी आहे.
advertisement
4/5
बीडीके ग्रुपचे एमडी विशाल गर्ग यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी फ्लाइंग बिग <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/how-to-book-flight-tickets-at-a-lower-rate-l18w-mhij-1156120.html">एअरलाइन्स</a>कडून उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यानं यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
advertisement
5/5
फ्लाइंग बिग एअरलाइन्सच्या <a href="https://news18marathi.com/photogallery/national/book-a-flight-ticket-in-just-150-rs-under-udan-scheme-read-details-mhkp-1164195.html">विमाना</a>तून प्रवाशांना 99 रुपये मूळ भाडं देऊन नंतर 354 रुपये भरून अलिगढ ते लखनऊ प्रवास करता येणार आहे. 19 सीटर विमानातून हा प्रवास होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
विमानप्रवास फक्त 99 रुपयांत! आता आकाशात उडायचं स्वप्न दूर नाही, Details एका क्लिकवर