Vitamin B12 for vegan: शाकाहारी आहात? टेन्शन नको ‘या’ पदार्थांतून मिळवा ‘व्हिटॅमिन बी 12’; राहा एकदम फिट
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Natural Sources of Vitamin B12 for Vegan: ‘व्हिटॅमिन बी 12’ हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक पोषक तत्वं आहे. नवीन रक्त तयार करण्यापासून ते रक्तक्षय रोखण्यापर्यंत आणि मज्जातंतूंना निरोगी ठेवण्यापासून ते तुमची स्मणशक्ती टिकवण्यापसाठी ‘व्हिटॅमिन बी 12’ फायद्याचं आहे. मासांहारी व्यक्तींना अनेक स्रोतांतून ‘व्हिटॅमिन बी 12’ मिळतं. मात्र शाकाहारी व्यक्तींसाठी ‘व्हिटॅमिन बी 12’ चे नैसर्गिक स्रोत फार कमी आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या शाकाहारी पदार्थातून तुम्हाला ‘व्हिटॅमिन बी 12’ मिळू शकतं.
advertisement
1/7

प्रमाणे ‘व्हिटॅमिन बी 12’ हे शरीरासाठी प्रचंड फायद्याचं आहे. तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन बी 12’ ची करतरता असेल तर तुम्हाला अनेक त्रास होऊ शकता. थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, त्वचा पिवळी पडणे, हातापायांना मुंग्या येणे, चालताना तोल जाणे असे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.
advertisement
2/7
व्हे प्रोटिन पावडरमध्ये फक्त प्रोटिन्सच नाही तर ‘व्हिटॅमिन बी 12’ सुद्धा आढळून येतं. साधरणपणे 23 ग्रॅम प्रोटीन पावडरमध्ये दैनंदिन गरजेच्या 5% ‘व्हिटॅमिन बी 12’ आढळून येतं. त्यामुळे दुधात व्हे प्रोटिन पावडर मिसळण्यास अधिक फायदे मिळू शकतात.
advertisement
3/7
जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुमच्यासाठी दररोज दूध पिणं फायद्याचं ठरेल. कारण दुधात भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन बी 12’ आढळून येतं. तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ 1 ग्लास गाईचं दूध प्यायलात तर त्या दुधातून तुम्हाला आवश्यक त्या प्रमाणाच ‘व्हिटॅमिन बी 12’ मिळेल.
advertisement
4/7
अनेक जण असे आहेत की त्यांना दूध पिणं आवडत नाही किंवा त्यांना दूध पचत नाही. अशा व्यक्तींसाठी दही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात गाईच्या दुधापासून बनवेलेल्या 1 वाटी दह्याचा समावेश केल्यास ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
5/7
शाकाहारी अन्नपदार्थातून ‘व्हिटॅमिन बी 12’ मिळवण्यासाठी पनीर हा आणखी चांगला पर्याय आहे. तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही ते कच्चं, तव्यावर फ्राय करून किंवा भाजी, पराठ्याच्या माध्यमातून खाऊ शकता.
advertisement
6/7
‘व्हिटॅमिन बी 12’ साठी फोर्टिफाइड फूडस हा सुद्धा एक चांगला पर्याय आहेत. ओट्स किंवा भिजवलेली कडधान्ये ‘व्हिटॅमिन बी 12’, ‘व्हिटॅमिन ए’ आणि फोलेट्सने समृध्द असतात. फोर्टिफाइड बदामाच्या दुधातही ‘व्हिटॅमिन बी 12’ चांगल्या प्रमाणात मिळून येतं.
advertisement
7/7
शाकाहारी व्यक्तींसाठी शिटाके मशरूम हा ‘व्हिटॅमिन बी 12’ चा एक पर्याय ठरू शकतं. मात्र त्यात अधिक प्रमाणात ‘व्हिटॅमिन बी 12’ नसल्याने पनीरमध्ये मशरूम मिसळून ‘मशरूम-पनीर’ सलाडही बनवून खाणं फायद्याचं ठरू शकतं. त्यात दही टाकल्याने सलाडला एक वेगळा स्वाद येईलच मात्र ‘व्हिटॅमिन बी 12’ चं प्रमाणही वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vitamin B12 for vegan: शाकाहारी आहात? टेन्शन नको ‘या’ पदार्थांतून मिळवा ‘व्हिटॅमिन बी 12’; राहा एकदम फिट