TRENDING:

Benefits of Vitamin B12 मांस, मच्छी सोडा; ‘या’ भाज्यांमधून सहज मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी12

Last Updated:
Benefits of vitamin B12 शरीरासाठी जीवनसत्व ब 12 म्हणजेच व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक गंभीर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. मासांहारी व्यक्तींना अनेक स्रोतांतून व्हिटॅमिन B12 मिळतं. मात्र शाकाहारी व्यक्तीसांठी व्हिटॅमिन B12 मिळवण्याचे स्रोत फार कमी आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या पालेभाज्या आणि शाकाहारी पदार्थातून व्हिटॅमिन बी12 मिळू शकतं.
advertisement
1/7
शकाहारी आहात तरीही टेन्शन नको; ‘या’ भाज्यांमधून मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी12
पालकभाजीत व्हिटॅमिन बी 12 भरपूर असतं. त्यामुळे आहारात पालकचा समावेश करून विविध पदार्थ बनवून खाणं तब्येतीसाठी खूप फायद्याचं असतं.
advertisement
2/7
बीट किंवा बीटरूटमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी 12 सोबत फोलेट आणि मँगनीज असतं. यात कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात. बीटचा रस किंवा सलाड म्हणून खाऊ शकता.
advertisement
3/7
भोपळा हा फळ आणि भाजी म्हणूनही ओळखला जातो. भोपळा मिनरल्स आणि फायबर्सने समृद्ध आहे. भोपळा हा व्हिटॅमिन बी 12चा उत्कृष्ट स्रोत आहे. मात्र फार कमी जण भोपळ्याचा वापर करतात.
advertisement
4/7
मशरूममध्ये जीवनसत्व बी 12 भरपूर प्रमाणात असते. मशरूम हे जीवनसत्व डी, प्रथिने, कॅल्शियम आणि जर्मेनियम, तांबे, नियासिन, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या इतर खनिजांचा देखील चांगला स्रोत आहेत.
advertisement
5/7
बटाट्यामध्ये स्टार्च, पोटॅशियम, सोडियम आणि व्हिटॅमिन बी 12 आणि जीवनसत्त्वे अ आणि ड यासारखी शरीरासाठी पुरेशी पोषक तत्त्वे असतात. हा मॅग्नेशियम, लोह आणि जस्त ह्यांचा देखील चांगला स्रोत आहे.
advertisement
6/7
तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा ते पचायला जड जात असेल तर दही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुमारे 70 ग्रॅम कमी फॅटयुक्त दह्यासह, आपण आपल्या दैनंदिन व्हिटॅमिन बी 12 ची 16% गरज भागवू शकतो.
advertisement
7/7
पनीर हा व्हिटॅमिन बी 12 साठी आणखी एक उत्तम पर्याय आहे. तो आपल्या व्हिटॅमिन बी 12 च्या दैनंदिन गरजेपैकी 20% पर्यंत व्हिटॅमिन शरीराला देऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Vitamin B12 मांस, मच्छी सोडा; ‘या’ भाज्यांमधून सहज मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी12
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल