Motion Sickness : तुम्हाला प्रवासात मळमळ उलट्या होतात? करा हे उपाय, मोशन सिकनेसपासून मिळेल मुक्ती
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण कुटुंब किंवा मित्रपरिवारासह फिरायला जातात. परंतु काहीवेळा बस, गाडी, रेल्वे इत्यादीतून प्रवास करताना मळमळ उलट्या होण्याचा त्रास होतो. अशावेळी नेमकं काय करावं कळत नाही आणि संपूर्ण ट्रिप खराब होऊन जाते. तेव्हा मोशन सिकनेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय प्रभावी ठरू शकतात.
advertisement
1/7

प्रवासात होणाऱ्या उलट्यांचा त्रासाला वैद्यकीय भाषेत 'मोशन सिकनेस' असं म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या जाणवते.
advertisement
2/7
सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. यामुळे प्रवासात उलट्या होणार नाहीत.
advertisement
3/7
प्रवासात डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला निघताना तोंडात एक लहान आल्याचा तुकडा ठेवा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. आल्याऐवजी तुम्ही आलेपाक किंवा आल्याची वडीही खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला उलटी आणि मळमळ यांपासून आराम मिळण्यास उपयोग होईल.
advertisement
4/7
कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या. तसेच मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.
advertisement
5/7
कारमध्ये उलट्यांचा धोका कमी करण्यासाठी जेवणासोबत पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.
advertisement
6/7
प्रवास करताना किंवा त्यापूर्वी तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.
advertisement
7/7
प्रवासा दरम्यान उलट्या होऊ नयेत यासाठी तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी काही औषध घेऊ शकता. तथापि, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे. (सदर मजकूर हा इंटरनेटवर दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Motion Sickness : तुम्हाला प्रवासात मळमळ उलट्या होतात? करा हे उपाय, मोशन सिकनेसपासून मिळेल मुक्ती