Alert! ताज्या पाण्याच्या वापरामुळे मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
ताज्या पाण्यामुळे सहा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
advertisement
1/5

सामान्यपणे ताजं पाणी म्हणजे चांगलं पाणी मानलं जातं. पण अशाच ताज्या पाण्याच्या वापरामुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत.
advertisement
2/5
अमेरिकेत अशी प्रकरणं आहेत. जॉर्जियामध्ये एका व्यक्तीचा एका अमिबामुळे मृत्यू झाल्याची माहिती जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या वर्षात या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे, तर 1962 नंतरचा हा सहावा मृत्यू आहे.
advertisement
3/5
गोड्या पाण्याच्या तलावात पोहोताना या व्यक्तीला संसर्ग झाला असावा, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पाण्यातील अमिबामुळे होणारा हा एक दुर्मिळ संसर्ग आहे, ज्यामुळे मेंदूतील ऊती नष्ट होतात, मेंदूला सूज येते आणि शेवटी लोकांचा मृत्यू होतो.
advertisement
4/5
नायगेलेरिया फावलेरी नावाने ओळखला जाणारा हा अमिबा ज्याला ‘ब्रेन इटिंग अमिबा’ म्हणतात. अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तो खूप वेगाने पसरत आहे.
advertisement
5/5
या प्रकारच्या अमिबाच्या उत्पत्तीला हवामानातील बदलही कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. नायगेलेरिया फावलेरी वातावरणात सामान्य आहे, त्यामुळे त्याची चाचणी किंवा तपासणीकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. विशेषत: वसंत ऋतु किंवा उन्हाळ्यात हा अमिबा हानिकारक ठरतो, असं डॉक्टर म्हणाले (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alert! ताज्या पाण्याच्या वापरामुळे मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण