Making Murmura At Home : भेळ खायची इच्छा झालीय, मुरमुरे संपलेत? घरीच प्रेशर कुकरमध्ये काही मिनिटांत होतील तयार!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to make murmura at home : भेळ सर्वांनाच आवडते आणि मुरमुरे हेल्दी पदार्थ असल्यामुळे लोक ते खातातही. पण बाहेरची भेळ तितकीशी सुराक्षित नसते. म्हणून बरेच लोक ती घरी बनवणे पसंत करतात. मात्र त्यासाठी मुरमुळे लागतात. पण जर तुम्हाला भेळ खावीशी वाटली आणि घरी मुरमुरेच नसतील तर? तर मुरमुरे घरीच बनवा तेही कोणत्याही मशिनशिवाय..
advertisement
1/7

कोडरमा येथील कुशल गृहिणी राधिका प्रजापती यांनी घरी मुरमुरे बनवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. त्यांच्यामते, घरी बनवलेले मुरमुरे फ्रेश आणि स्वच्छ असतात. तसेच ते घरी बनवताना फक्त साधेच न बनवता तुम्ही त्यांना वेगवेगळे फ्लेवरदेखील देऊ शकतात.
advertisement
2/7
राधिका प्रजापती यांनी सांगितले की चांगले मुरमुरे बनवण्यासाठी योग्य तांदूळ महत्त्वाचा आहे. यासाठी शक्यतो जुना तांदूळ वापरावा. जुन्या तांदळात नवीन तांदळापेक्षा कमी नैसर्गिक ओलावा असतो. कमी आर्द्रतेमुळे जेव्हा हा तांदूळ गरम मीठात टाकला जातो, तेव्हा तो लगेच फुगतो आणि पांढरा-हलका होतो.
advertisement
3/7
राधिका यांनी मुरमुरे बनवण्याच्या काही स्टेप्स सांगितल्या आहेत, आधी एक कप जुने तांदूळ घ्या. एक चमचा मीठ आणि फक्त 1 ते 2 चमचे पाणी घाला. नीट मिसळा जेणेकरून तांदळाच्या प्रत्येक दाण्यावर मीठाचा हलका लेप असेल.
advertisement
4/7
मीठ आणि पाणी मिसळल्यानंतर तांदूळ एका प्लेटवर पसरवा आणि पंख्याखाली किंवा सौम्य सूर्यप्रकाशात 10 ते 15 मिनिटे वाळवा. तांदूळातील अतिरिक्त ओलावा काढून टाकण्यासाठी आणि भाजताना ते फुटू नये म्हणून हे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/7
बाजारात मुरमुरे बनवण्यासाठी तांदूळ वाळूमध्ये भाजले जातात, परंतु राधिका घरगुती स्वयंपाकासाठी मीठ-आधारित तंत्र सुचवते. प्रेशर कुकरमध्ये पुरेसे सामान्य मीठ घाला आणि ते जास्त आचेवर गरम करा. मीठ पूर्णपणे गरम झाल्यावर एकावेळी थोडेच तांदूळ घाला. त्याला सतत ढवळत रहा. काही सेकंदात तांदूळ फुगू लागतील आणि पांढरे शुभ्र मुरमुरे तयार होतील.
advertisement
6/7
तांदूळ फुगताच अतिरिक्त मीठ काढून टाकण्यासाठी ताबडतोब चाळणीतून चाळून घ्या. राधिकाने संगीतोळे की मुरमुरे बनवण्यासाठी किंवा कोणताही पदार्थ बेक करण्यासाठी तुम्ही हे मीठ वारंवार वापरू शकता. तयार मुरमुरे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर हवाबंद डब्यात साठवा. अशा प्रकारे साठवल्याने मुरमुरे अनेक महिने फ्रेश राहतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Making Murmura At Home : भेळ खायची इच्छा झालीय, मुरमुरे संपलेत? घरीच प्रेशर कुकरमध्ये काही मिनिटांत होतील तयार!