TRENDING:

Tips And Tricks : केसांवर किंवा कपड्यांवर चिकटलेलं च्युईंग गम सहज निघेल! 'या' सोप्या टिप्स करा फॉलो..

Last Updated:
Ways to remove chewing gum from cloths and hair : बऱ्याच लोकांना च्युईंग गम खाण्याची सवय असते. हे च्युईंग गम आपल्या अरिग्यासाठी तर चांगलं नसतंच. शिवाय जर ते आपल्या कपड्यांवर चिकटलं तर ते काढणं आणखी जड जात. कपड्यांचं तर सोडा जर ते केसांमध्ये अडकलं तर केस कापण्याचीही वेळ येऊ शकते. पण तुम्ही काळजी करू नका. कारण यावरही उपाय आहेत.
advertisement
1/7
केसांवर किंवा कपड्यांवर चिकटलेलं च्युईंगगम सहज निघेल! या सोप्या टिप्स करा फॉलो..
च्युईंगम कपड्यांवर किंवा केसांवर चिकटणे फार त्रासदायक आणि वाईट असते. कारण ते सोडवता सोडवता आपल्या नाकी नऊ येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अगदी सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, जे चिकटलेले च्युईंगम सहज निघेल.
advertisement
2/7
बर्फाचा वापर : ही अत्यंत सोपी पद्धत आहे. बर्फ च्युइंगगम कडक करते, ज्यामुळे ते काढणे सोपे होते. यासाठी च्युईंग गमवर बर्फाचा तुकडा ठेवा किंवा फ्रीजरमध्ये 10-15 मिनिटे कापड ठेवा. च्युईंगम कडक झाल्यावर चाकू किंवा कार्डने ते हळूवारपणे खरवडून काढा.
advertisement
3/7
गरम पाणी किंवा वाफ : च्युईंगम खोलवर रुतलेला असताना ही पद्धत उपयुक्त आहे. यासाठी कपड्यावर गरम पाणी घाला किंवा गरम वाफ द्या. याने च्युईंगम मऊ आणि सैल होईल. आता ते चमच्याने सहजपणे काढा. मात्र नाजूक कापडांवर जास्त गरम पाणी वापरणे टाळा.
advertisement
4/7
तेल किंवा पीनट बटर : हा उपाय केसांसाठी बेस्ट आहे. जेव्हा च्युईंगम केसांना चिकटले असेल, तेव्हा तो ओढल्याने केस तुटू शकतात. म्हणून अशावेळी च्युईंग गम चिकटलेल्या भागावर नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा पीनट बटर लावा. 2 मिनिटे मालिश करा. च्युईंगम केसांमधून सरकू लागेल आणि हळूहळू तुमच्या हातात येईल. तुम्ही हा उपाय लेदर किंवा प्लास्टिकच्या वस्तूसाठीही वापरू शकता.
advertisement
5/7
व्हिनेगर : व्हिनेगर च्युईंग गमचा चिकटपणा तोडतो. थोडेसे व्हिनेगर गरम करा आणि ते कापडावर जिथे च्युईंग गम चिकटले आहे, तिथे टाका. ब्रशने घासून घ्या. च्युईंगम सैल होईल आणि सहजपणे निघून जाईल. हा उपाय तुम्ही कार्पेट, डेनिम किंवा मजबूत कापडावर वापरू शकता.
advertisement
6/7
नेलपॉलिश रिमूव्हर किंवा अल्कोहोल : ही पद्धत विशेषतः शूज, बॅग किंवा कठीण पृष्ठभागावर उपयुक्त आहे. नेलपेंट रिमूव्हर कापसाच्या बॉलवर घेऊन च्युईंगमवर लावा. 1 मिनिटानंतर च्युईंगम खरवडून काढा. नाजूक कापड किंवा चामड्यावर हे वापरू नका.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : केसांवर किंवा कपड्यांवर चिकटलेलं च्युईंग गम सहज निघेल! 'या' सोप्या टिप्स करा फॉलो..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल