White Bread vs. Brown Bread : खरंच ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेडपेक्षा हेल्दी असतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
White Bread vs. Brown Bread which is healthier : व्हाईट ब्रेड चांगला नाही म्हणून हेल्दी समजून तुम्हीही ब्राऊन ब्रेड खात असला तर इंडियन अकादमी ऑफपेडियाट्रिक्सने दिलेली ही माहिती वाचायलाच हवी.
advertisement
1/5

आजकाल बाजारात व्हाईट ब्रेड, बटर ब्रेड, ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड आणि असे इतर अनेक प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत. पण स्पर्धा असते की व्हाईट आणि ब्राऊन ब्रेडमध्ये. आरोग्याबाबत जागरूक असलेले बरेच लोक ब्राऊन ब्रेड खरेदी करतात. व्हाईट ब्रेड का खरेदी केला नाही असं विचारलं तर ते ब्राऊन ब्रेडचे फायदे सांगतात. पण खरंच म्हणतात तितका ब्राऊन ब्रेड हेल्दी आहे का? दोन्ही ब्रेडपैकी कोणता ब्रेड खरंच हेल्दी आहे?
advertisement
2/5
ब्रेड आजकाल प्रत्येक घरात मुबलक प्रमाणात वापरला जात आहे. पण इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सने विशेषतः पालकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, आरोग्य तज्ञ मुलांच्या आहारात शक्य तितक्या कमी ब्रेडचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत. मार्गदर्शक तत्वांमध्ये ब्रेडला जंक फूड म्हटलं आहे. ब्रेड अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये येतो. जंक फूड केवळ मुलांसाठीच नाही तर प्रौढांसाठी देखील हानिकारक आहे.
advertisement
3/5
ब्रेडमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. त्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप कमी असतात, तर त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज भरपूर असतात. विशेषतः साधे कार्बोहायड्रेट्स असलेल्या पांढऱ्या ब्रेडमुळे अवांछित वजन वाढू शकतं किंवा मधुमेह किंवा हृदयरोगासारखे काही जुनाट आजार होऊ शकतात.
advertisement
4/5
मार्गदर्शक तत्वांमध्ये असं म्हटलं आहे की ज्यांना असं वाटतं की ब्राऊन ब्रेडमध्ये असं काहीही नाही आणि ते पांढऱ्या ब्रेडपेक्षा आरोग्यदायी आहे त्यांना हे माहित असलं पाहिजे की बहुतेक किंवा जवळजवळ सर्व ब्राऊन ब्रेड रिफाइंड पिठापासून बनवले जातात आणि पांढऱ्या ब्रेडप्रमाणेच त्यावर प्रक्रिया केल्या जातात.
advertisement
5/5
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असा भ्रम असेल की ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही, तुम्हाला डायबेटिस किंवा हृदयरोग होणार नाहीत, तर तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असं म्हटलं आहे की जे लोक वेळेअभावी अनेकदा रेडी-टू-ईट ब्रेड खातात, मग ते व्हाईट असो वा ब्राऊन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे ब्रेड खाणं म्हणजे अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
White Bread vs. Brown Bread : खरंच ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेडपेक्षा हेल्दी असतो?