Winter Physical Relation: हिवाळ्यात शारीरिक संबंधाचं प्रमाण का वाढतं? संशोधनातून नवी माहिती समोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
हिवाळ्यात पुरुषांना महिलांचं शरीर अधिक आकर्षक वाटतं. तसंच गर्भधारणेसाठीदेखील हा काळ चांगला असतो.
advertisement
1/7

सेक्स करणं म्हणजेच लैंगिक संबंध ठेवणं, ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. सेक्स हा कोणत्याही लव्ह रिलेशनशिपचा नैसर्गिक आणि इंटिमेट पैलू आहे. सध्या हिवाळा सुरू असून हा ऋतू सेक्ससाठी सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात स्पर्मची गुणवत्ता चांगली असते. म्हणूनच हा ऋतू सेक्ससाठी चांगला मानला जातो. हिवाळ्यात सेक्स करण्याचे अनेक फायदे आहेत.
advertisement
2/7
1) थंडीत शरीराला ऊब मिळणं गरजेचं : उन्हाळ्यात सेक्स करणं फारसं आरामदायक ठरत नाही. उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि खराब हवामानामुळे सेक्सची इच्छाही होत नाही. याउलट, हिवाळ्यात ज्या व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत झोपतात त्यांच्या शरीराचं तापमान जास्त असतं. हिवाळ्यात सेक्स केल्याने शरीराला ऊब मिळते आणि मूडही चांगला होतो.
advertisement
3/7
2) हॅपी हॉर्मोन्समुळे मूड होतो चांगला : हिवाळ्यात सेक्स केल्याने शरीरात ऑक्सिटॉसिन आणि एंडॉर्फिनचं प्रमाण वाढतं. लव्ह आणि हॅपी हॉर्मोन असलेलं ऑक्सिटोसिन हिवाळ्यात जास्त प्रमाणात स्रवतं. त्यामुळे मूड चांगला होतो आणि मन प्रसन्न होतं. हिवाळ्यात ऑक्सिटोसिन वाढल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अनेक आजार आणि समस्यांपासूनही आराम मिळतो.
advertisement
4/7
3) ऑरगॅझमसाठी हिवाळा उपयुक्त : ऑरगॅझम (कामोत्तेजना) मिळवण्यासाठीदेखील हिवाळा उपयुक्त आहे. पायातल्या रक्तवाहिन्या पातळ असतात आणि सेक्स करताना उष्णतेमुळे त्यातला रक्तप्रवाह वाढतो. यामुळे लवकर ऑरगॅझम मिळण्यास मदत होते. ऑरगॅझममुळे काळजी आणि तणाव दूर होतो. तसंच, हिवाळ्यात एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन जास्त प्रमाणात स्रवतं. परिणामी आनंद होतो.
advertisement
5/7
4) स्पर्म क्वालिटी : थंड हवामानात स्पर्म क्वालिटी चांगली असते. एका संशोधनानुसार, हिवाळ्यात स्पर्मची घनता जास्त असते. अशा प्रकारचं स्पर्म स्त्रीबीज फलित करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतं. म्हणून हिवाळ्यात सेक्स करणं चांगलं मानलं जातं.
advertisement
6/7
संशोधनात असं निदर्शनास आलं आहे, की हिवाळ्यात पुरुषांना महिलांचं शरीर अधिक आकर्षक वाटतं. तसंच गर्भधारणेसाठीदेखील हा काळ चांगला असतो. स्पर्मची घनता आणि हाय टेस्टोस्टेरॉन लेव्हलमुळे पुरुष आणि स्त्रिया दोघंही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अधिक प्रजननक्षम असतात.
advertisement
7/7
5) आनंद मिळतो : असं मानलं जातं की, हिवाळ्यात सेक्सची इच्छा जास्त असते. प्रत्येकाची इच्छा असते, की सेक्सचा कालावधी जास्त असावा. उन्हाळ्यात प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. याउलट अनेक जोडपी हिवाळ्यात सेक्सचा अधिक आनंद घेण्यास सक्षम असतात. असंही मानलं जातं, की हिवाळ्यात महिला सेक्सचा जास्त आनंद घेतात. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची जास्त गरज असते. अशा स्थितीत जोडीदाराचा स्पर्श सर्वाधिक ऊब देऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Winter Physical Relation: हिवाळ्यात शारीरिक संबंधाचं प्रमाण का वाढतं? संशोधनातून नवी माहिती समोर