TRENDING:

रसवंतीगृहांची नावं 'कानिफनाथ', 'नवनाथ'च का असतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
Why Sugarcane Stall Names As Kanifnath And Navnath : उन्हाळा आला की पावलं आपोआप रसवंती गृहांकडे वळू लागतात. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेकजण ऊसाचा ताजा रस पिण्यास प्राधान्य देतात. परंतु तुम्ही जर त्या रसवंती गृहांची नाव वाचलीत तर ती कानिफनाथ किंवा नवनाथ अशीच असतात. परंतु यामागचं नेमकं कारण काय याविषयी अनेकजणांना माहित नसते.
advertisement
1/5
रसवंतीगृहांची नावं 'कानिफनाथ', 'नवनाथ' अशीच का असतात?
नवनाथ आणि कानिफनाथ अशी एकाच नावाची अनेक रसवंती गृह पहिली की अनेकांना ही रसवंती गृह एकाच माणसाच्या मालकीची असतील असं वाटतं. तर काहीजण नवनाथ आणि कानिफनाथ रसवंती गृहाचे मालक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मॅक्डोनल् आणि केएफसी प्रमाणे फ्रेंचायझी देत असतील असा अंदाज लावतात. मात्र हे रसवंती गृहांच्या नावामागील कारण नाही.
advertisement
2/5
नवनाथ रसवंती गृहाच्या नावामागची गोष्ट सांगताना एका ट्विटरवरील डॉक्टर निलेश श्रीनिवास मंत्री या युझरने लिहिले, नवनाथ रसवंती गृहाच्या नावाची गोष्ट साधारण 70 ते 80 वर्षांपूर्वीची आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगाव नावाचं एक गाव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या गावचा शेतकरी थोड्याथोडक्या पाण्यावर ऊसाची शेती करत होता. त्याकाळी साखर कारखान्यांना पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे ऊसाला हक्काचं मार्केट नव्हतं, त्यामुळे त्यातून मिळणारा रोजगार नव्हता त्यामुळेच रसवंती गृहांच्या उद्योगाला सुरुवात झाली असावी असं म्हंटल जात.
advertisement
3/5
अशाच एका गावातील एक तरुण नोकरी शोधण्यासाठी मुंबईला आला तेव्हा त्याला कळाले की इथे ऊसाला भरपूर मागणी आहे. पूर्वी देशी ऊस असायचे ते लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येतील असे होते. तेव्हा सुरुवातीला उसाचे छोटे छोटे तुकडे बरणीत भरून विकले जायचे. मग कोण्याच्या तरी लक्षात आलं की दारोदारी ऊस विकण्यापेक्षा एका ठिकाणी दुकान टाकून त्या ऊसाचा रस विकावा. हळूहळू या ऊसाच्या रसाने मुंबईकरांवर जादू केली आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी ऊसाचा रस देणारी रसवंती गृह उघडली.
advertisement
4/5
बोपगावमधून <a href="https://news18marathi.com/web-stories/lifestyle/why-bells-attached-to-sugarcane-juice-machines-know-reason-un-marathi-mhpp-2018723/">रसवंती गृह चालवणारे महाराष्ट्रभर पसरले</a> त्या बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाच्या 9 नाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तपश्चर्येला बसले होते असं सांगितलं जात. आजही तेथे सुंदर मंदिर आहे. त्यामुळेच संपूर्ण पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी 'नवनाथ' ठेवलं तर कुणी 'कानिफनाथ' ठेवलं," असं म्हटलं जातं.
advertisement
5/5
तसेच ऊसाच्या रसवंती गृहाची नाव नवनाथ किंवा कानिफनाथ ठेवण्यामागील अजून एक कारण समोर येत. ते म्हणजे ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली अशी दंतकथा आहे. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस, रस, गूळ आवडतो. इतका यामागील साधा अर्थ आहे. दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे. त्यामुळे 'नवनाथ रसवंती', 'कानिफनाथ रसवंती' ही नावे ठेवण्याची प्रथा पडली आणि मग त्या रसवंती गृहांचं यश पाहून इतर लोकांनी देखील त्याच नावाने रसवंती गृह सुरु केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
रसवंतीगृहांची नावं 'कानिफनाथ', 'नवनाथ'च का असतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल