TRENDING:

Winter Skin Care : हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि ओपन पोर्सचा त्रास? मग 'हे' 5 घरगुती उपाय एकदम बेस्ट

Last Updated:
चला तर पाहूया, हिवाळ्यात ओपन पोर्स आणि ड्राय स्किनची समस्या कशी दूर करावी.
advertisement
1/8
हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि ओपन पोर्सचा त्रास? मग 'हे' 5 घरगुती उपाय एकदम बेस्ट
हिवाळा आला की त्वचेची (Winter Skin Care) काळजी घेणं अत्यावश्यक होतं. थंड वातावरण, कोरडी हवा आणि कमी आर्द्रता यामुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि खडबडीत होते. विशेषतः चेहऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या या काळात वाढते. हे फक्त सौंदर्यावर परिणाम करत नाही, तर आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरच्या घरी केलेले काही सोपे आणि नैसर्गिक उपाय खूप उपयोगी ठरू शकतात.
advertisement
2/8
चला तर पाहूया, हिवाळ्यात ओपन पोर्स आणि ड्राय स्किनची समस्या कशी दूर करावी.
advertisement
3/8
1. बर्फाने त्वचा टाईट कराहा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. बर्फामुळे त्वचा टाईट होते आणि ओपन पोर्स कमी दिसतात.कसे करावे:एक स्वच्छ कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. जिथे पोर्स जास्त आहेत त्या भागावर जास्त वेळ ठेवा. दिवसातून एकदा 1-2 मिनिटं मसाज केल्याने फरक जाणवतो.
advertisement
4/8
2. मुलतानी मातीचा फेसपॅकमुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण शोषून घेते. त्यामुळे पोर्स क्लीन आणि लहान दिसतात.कसे करावे:2 चमचे मुलतानी माती घ्या आणि गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा, वाळू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा थंड आणि टाईट होते.
advertisement
5/8
3. अ‍ॅलोवेरा जेलची जादूअ‍ॅलोवेरा त्वचेला ओलावा देतो आणि नैसर्गिकरित्या पोर्स घट्ट करतो.कसे करावे:चेहरा धुवून त्यावर ताजं अ‍ॅलोवेरा जेल लावा. 10-15 मिनिटं ठेवून साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते.
advertisement
6/8
4. मध आणि लिंबाचा स्क्रबमध आणि लिंबू हे दोन्ही नैसर्गिक एक्सफोलिएंट आहेत. हे मृत पेशी काढून टाकतात आणि त्वचेला ग्लो देतात.कसे करावे:1 चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर 2-3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने धुवा.
advertisement
7/8
5. बेसन आणि दह्याचा फेसपॅकबेसन त्वचेची खोलवर स्वच्छता करतो, तर दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेला पोषण देतं.कसे करावे:2 चमचे बेसन आणि 1 चमचा दही एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटं वाळू द्या. नंतर पाण्याने धुवा.
advertisement
8/8
अतिरिक्त काळजीदिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ धुवा.पुरेसं पाणी प्या.बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा.कोणताही उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं विसरू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Winter Skin Care : हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि ओपन पोर्सचा त्रास? मग 'हे' 5 घरगुती उपाय एकदम बेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल