TRENDING:

Mumbai Goa Highway : कबड्डी... कबड्डी...म्हणणारा आवाज कायमचा शांत झाला, मुंबई-गोवा हायवेवर हरहुन्नरी खेळाडूवर काळाचा घाला

Last Updated:
मुंबई-गोवा महामार्गावर कोंडमळा येथे डम्परच्या अपघातात कबड्डीपटू अमित एकनाथ हुमणे याचा मृत्यू झाला. सुरेश हुमणे गंभीर जखमी. पोलिस तपास सुरू आहे.
advertisement
1/6
कबड्डी... कबड्डी...म्हणणारा आवाज कायमचा शांत झाला,खेळाडूवर काळाचा घाला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रत्नागिरीजवळ हातखंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका भीषण अपघाताने कोकणावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कबड्डीपटूनं जीव गमावला.
advertisement
2/6
महामार्गावर उभ्या असलेल्या एका डम्परला मागून येणाऱ्या दुसऱ्या वाळूच्या डम्परने जोरदार धडक दिली, ज्यात केबिनमध्ये बसलेल्या अमित एकनाथ हुमणे या होतकरू तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
3/6
मृत्यू झालेला अमित हुमणे हा कोकणची शान होता. कोकणातील गुणवान कबड्डीपटू म्हणून त्याची ओळख होती. त्याने कबड्डीमध्ये बक्षीसही पटकवली होती. सोबतच, तो महावितरणमध्ये कर्मचारी म्हणूनही कार्यरत होता.
advertisement
4/6
अवघ्या तिशीतच काळाने घाला घातल्यामुळे हुमणे कुटुंबावर दुःखाचा अतिविशाल डोंगर कोसळला आहे. चिपळूण परिसरातून अमितच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. हा भीषण अपघात चिपळूण तालुक्यातील कोंडमळा परिसरात शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास झाला. डम्पर चालक सुरेश दौलत हुमणे हे आपला डम्पर घेऊन अमितसह आगवे गावाकडून चिपळूणच्या दिशेने जात होते.
advertisement
5/6
रस्त्यावर उभा असलेल्या या डम्परला सुरेश हुमणे यांच्या डम्परची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, पुढच्या केबिनमध्ये बसलेल्या अमित एकनाथ हुमणे याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक सुरेश हुमणे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
6/6
अपघाताची माहिती मिळताच, सावर्डे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर चुकीच्या पद्धतीने डम्पर उभा करणाऱ्या चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Mumbai Goa Highway : कबड्डी... कबड्डी...म्हणणारा आवाज कायमचा शांत झाला, मुंबई-गोवा हायवेवर हरहुन्नरी खेळाडूवर काळाचा घाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल