Weather Update : वारं फिरलं! अर्ध्या मराठवाड्यात आज वादळी पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Weather Update : हवामान विभागाकडून आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.
advertisement
1/4

हवामान विभागाकडून आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला अधूनमधून पाऊस आज पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/4
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगांचे प्रमाण वाढणार असून दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढू शकते असा देखील अंदाज आहे. काही भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी उघड्यावर काम करताना विजेच्या कडकडाटापासून सावध राहावे असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/4
दरम्यान, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, अधूनमधून सरींचा अनुभव येऊ शकतो. हवामानातील या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
4/4
तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र आज संपूर्णतः हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. खरंतर येथे सकाळपासूनच उन्हाचे प्रमाण वाढून वातावरण उष्ण राहू शकते अशी शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Weather Update : वारं फिरलं! अर्ध्या मराठवाड्यात आज वादळी पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट