Long Weekend Travel : या लॉन्ग विकेण्डसाठी नागपूरजवळच फिरायला जायचंय? 'ही' आहेत काही भन्नाट ठिकाणं!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Long Weekend Travel Places : लॉन्ग वीकेंड आला की सगळ्यांनाच शहराच्या गोंगाटापासून थोडा ब्रेक घ्यावा असे वाटते. रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, नवीन ठिकाणे पाहणे आणि मनाला शांतता मिळवणे यासाठी लॉन्ग वीकेंड सर्वोत्तम ठरतो. आता 25, 26, 27 जानेवारी हा लॉन्ग येत आहे. विदर्भाची राजधानी असलेले नागपूर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर असून, येथून कमी वेळात पोहोचता येतील अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आजूबाजूला आहेत. त्यामुळे फारसा खर्च किंवा जास्त प्रवास न करता नागपूरजवळील ठिकाणे लॉन्ग वीकेंड साठी उत्तम पर्याय ठरतात.
advertisement
1/7

पेंच नॅशनल पार्क : नागपूरजवळील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पेंच नॅशनल पार्क. हे ठिकाण नागपूरपासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर आहे. जंगल सफारी, वाघ, बिबटे आणि विविध प्रकारचे पक्षी पाहण्याचा अनुभव इथे मिळतो. निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रण करणाऱ्यांसाठी पेंच हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. लॉन्ग वीकेंडमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत इथे वेळ घालवता येतो.
advertisement
2/7
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : हे नागपूरजवळील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून ताडोबा ओळखला जातो. नागपूरपासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर असलेले हे जंगल साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. वाघ दर्शन, निसर्गरम्य परिसर आणि जंगल सफारीचा थरार अनुभवण्यासाठी लॉन्ग वीकेंडमध्ये ताडोबा उत्तम ठिकाण मानले जाते.
advertisement
3/7
रामटेक : तुम्हाला शांतता आणि अध्यात्मिक वातावरण हवे असेल तर रामटेक हे ठिकाण जरूर भेट द्या. नागपूरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. रामटेक किल्ला, मंदिरं आणि सभोवतालचा हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करतो. कमी वेळेत शांत सहल करण्यासाठी रामटेक लॉन्ग वीकेंडसाठी योग्य पर्याय आहे.
advertisement
4/7
अंबाझरी लेक आणि सेमाडोह परिसर : निसर्गसौंदर्य आणि धबधब्यांचा आनंद घ्यायचा असेल तर अंबाझरी लेक आणि सेमाडोह परिसरही उत्तम पर्याय ठरू शकतो. सेमाडोह हे मेलघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात येते आणि नागपूरपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे. हिरवीगार जंगले, थंड हवा आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण रिलॅक्सिंग ट्रिपसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
5/7
चिखलदरा : इतिहासप्रेमींना चिखलदरा हे ठिकाण आकर्षित करते. महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन असलेले चिखलदरा नागपूरपासून साधारण 230 किलोमीटर अंतरावर आहे. थंड हवामान, सुंदर दऱ्या-खोऱ्या, भिलगड आणि गविलगड किल्ला पाहण्यासाठी लॉन्ग वीकेंडमध्ये चिखलदऱ्याला भेट देता येते. उन्हाळ्यात खास करून हे ठिकाण पर्यटकांना अधिक आकर्षित करते.
advertisement
6/7
नागपूरजवळील ही सर्व पर्यटनस्थळे कमी वेळेत पोहोचण्यास सोपी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि वेगवेगळे अनुभव देणारी आहेत. लॉन्ग वीकेंडचा योग्य उपयोग करून कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत या ठिकाणांना भेट दिल्यास मन आणि शरीर दोन्ही रिफ्रेश होतात. म्हणूनच येणाऱ्या लॉन्ग वीकेंडला या पर्यायांचा विचार नक्की करा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Long Weekend Travel : या लॉन्ग विकेण्डसाठी नागपूरजवळच फिरायला जायचंय? 'ही' आहेत काही भन्नाट ठिकाणं!