बायकोला डिवोर्स, शमिता शेट्टीसोबत ब्रेकअप; आजही लाखो तरुणी फिदा, राकेश बापटचं वय किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Raqesh Bapat Age : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील हँडसम हंक अभिनेता म्हणजेच राकेश बापट. त्याच्यावर आजही अनेक तरुणी फिदा आहेत. राकेश बापट खरं वय किती?
advertisement
1/8

मराठी अभिनेता राकेश बापट सध्या 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सहभागी झाला आहे. बिग बॉस ओटीटी गाजवून आलेला राकेश मराठी बिग बॉसमध्येही उत्तम खेळताना दिसतोय. शांत स्वभाव आणि दिसायला देखणा राकेश बापट आजही कित्येक तरुणींच्या मनावर राज्य करतो.
advertisement
2/8
अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्याने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून स्वतःची ओळख निर्माण केली. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही राकेशने काम केलं आहे.
advertisement
3/8
राकेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव अनेकदा चर्चेत आलं आहे. 2010 साली त्यानेअभिनेत्री रिद्धी डोंगराबरोबर लग्न केलं. दोघांचा 8 वर्षांचा सुखी संसार होता. 2019 मध्ये दोघांनी डिवोर्स घेतला. डिवोर्सनंतर राकेशने स्वतःला कामात झोकून दिलं. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबद्दल त्याने अनेकदा स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे.
advertisement
4/8
त्यानंतर बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांची जवळीक पाहायला मिळाली होती. या दोघांच्या नात्याची चर्चा बराच काळ रंगली होती. चाहत्यांनीही या जोडीला भरभरून प्रेम दिलं. मात्र काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली.
advertisement
5/8
मधल्या काळात राकेशनं मराठी सिनेमा आणि मालिकेतही काम केलं. राकेश बापटने आतापर्यंत 'सिटिझन', 'वृंदावन', 'सर्व मंगल सावधान', 'सविता दामोदार परांजपे', 'व्हॉट्स अँप लव्ह', 'मुंबई आपली आहे', 'फोरेव्हर', 'सरसेनापती हंबीरराव', 'खुर्ची' सारख्या मराठी सिनेमात काम केलं आहे.
advertisement
6/8
त्याचबरोबर झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतही काम केलं. त्याची एजेची भूमिका खूप फेमस झाली होती.
advertisement
7/8
आता ‘बिग बॉस मराठी 6’च्या माध्यमातून राकेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरात त्याचा संयमी, समजूतदार खेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. असे अनेक कलाकार आहे ज्यांचं वय नेमकं किती आहे याचा अंदाज फार पटकन लागत नाही. राकेश बापटचं वय किती आहे माहितीये?
advertisement
8/8
राकेश बापटचा जन्म 1 सप्टेंबर 1978 रोजी झाला. आता राकेशचं वय 47 वर्ष इतकं आहे. राकेशचं वय 47 वर्ष असलं तरी त्याची फिटनेस, चार्म आणि व्यक्तिमत्त्व पाहता आजही लाखो तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बायकोला डिवोर्स, शमिता शेट्टीसोबत ब्रेकअप; आजही लाखो तरुणी फिदा, राकेश बापटचं वय किती?