नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार! मृत्यू डोळ्यासमोर पाहिला, चालकाचं काय झालं? घटनास्थळावरचे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शालिमार परिसरात कारला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली, चालक लक्ष्मण घाटोळ सुरक्षित. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
advertisement
1/6

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकचं हार्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या शालिमार परिसरात आज दुपारच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच संपूर्ण कारमध्ये आग पसरली. वर्दळीच्या रस्त्यावर अचानक कारमधून धूर निघू लागल्याने आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळा भडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
advertisement
2/6
या आगीत कारचा कोळसा झाला असला, तरी सुदैवाने चालक सुरक्षित आहे. न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन शालिमार चौकातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला.
advertisement
3/6
काहीतरी अघटित घडणार याचा अंदाज येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता धावत्या गाडीतून बाहेर उडी घेतली. काही सेकंदातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. जर चालकाने वेळीच उडी घेतली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता.
advertisement
4/6
भररस्त्यात आगीचा गोळा बनलेली कार पाहून रस्त्यावरील पादचारी आणि इतर वाहनधारकांची प्रचंड पळापळ झाली. अजून स्फोट होतील कुणी जवळ जाऊ नका! असं पोलीस वारंवार लोकांना आवाजन करत आहेत.
advertisement
5/6
आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की, आजूबाजूच्या दुकानांनाही याचा फटका बसतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
advertisement
6/6
घटनेची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार! मृत्यू डोळ्यासमोर पाहिला, चालकाचं काय झालं? घटनास्थळावरचे PHOTO