TRENDING:

आदिवासी महिलांनी घडवल्या अप्रतिम कलाकृती; 'बांबू लेडी'ची जगभर चर्चा PHOTOS

Last Updated:
बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचं कौशल्य मिळवलेल्या मीनाक्षी यांनी यातूनच अनेक आदिवासी महिलांना रोजगार मिळवून दिलाय.
advertisement
1/9
आदिवासी महिलांनी घडवल्या अप्रतिम कलाकृती; 'बांबू लेडी'ची जगभर चर्चा PHOTOS
आयुष्य जगत असताना एखादे ध्येय मनाशी ठरवून त्या दिशेने सतत चालत राहणाऱ्यांना यश हमखास मिळते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे चंद्रपूर येथील बंगाली झोपडपट्टीत राहणाऱ्या मीनाक्षी वाळके या होय.
advertisement
2/9
बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचं कौशल्य मिळवलेल्या मीनाक्षी यांनी यातूनच अनेक आदिवासी महिलांना रोजगार मिळवून दिलाय. त्यांनी बनवलेल्या बांबूच्या खास कलाकृतींना जगभरात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे या कार्यामुळेच त्यांना ‘द बांबू लेडी ऑफ इंडिया’ या नावानं ओळखलं जातंय.
advertisement
3/9
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे माझे बालपण आणि शालेय शिक्षण झाले. 2014 मध्ये विवाह झाल्यानंतर शिक्षण थांबले. दुसऱ्या प्रसूतीदरम्यान सातव्या महिन्यातच मुलीचा मृत्यू झाला. पण रुग्णालयातून आल्यावर अवघ्या बारा दिवसांत मी हाती बांबू घेतला. मन स्वस्थ बसू देत नव्हते.
advertisement
4/9
चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात मी प्रशिक्षणासाठी रुजू झाले. दरम्यान, अशक्तपणामुळे कित्येकदा भोवळ येऊन देखील मी पडले. पण त्यातून सावरत मी माझ्या मार्गावर चालत राहिले. आज माझे यश आणि एकंदरीत प्रवास बघून मला फार समाधान वाटतं आहे, अशी भावना मीनाक्षी वाळके व्यक्त करतात.
advertisement
5/9
गडचिरोली भामरागड, चंद्रपूर आदी ठिकाणच्या परिघात बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साधारणतः पाच वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात बांबूपासून कलाकृती तयार करण्याची कल्पना आली आणि मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
advertisement
6/9
कालांतराने यात सुधारणा होत गेली. अनेक तंत्रज्ञान आणि मशीनच्या साह्याने मी आज नाविन्यपूर्ण कलाकृती घडवत आहे. माझ्यासह समाजातील अनेक गरजू घटकापर्यंत या उद्योगातून रोजगार निर्मिती होत आहे. महिला सबलीकरण, आत्मनिर्भर महिला यासाठी आज हा उपक्रम अनेकांसाठी वरदान ठरला आहे, असे मीनाक्षी सांगतात.
advertisement
7/9
मीनाक्षी यांनी तयार केलेल्या बांबूच्या वस्तूंना जगभरात मागणी आहे. त्यामुळेच त्यांची जगभरात वेगळी ओळख निर्माण झालीय. इंग्लंडची संसद हाउस ऑफ कॉमन्समध्ये आयआयडब्लूशी इंस्पिरेस अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या मीनाक्षी वाळके या भारतातील पहिल्या बांबू कलावंत आहेत. ‘द बांबू लेडी ऑफ इंडिया’ म्हणून त्यांना गौरवण्यात आलं आणि तीच त्यांची ओळख बनलीय.
advertisement
8/9
कुठलाही वारसा किंवा पाठबळ नसताना मीनाक्षी वाळके यांनी अभिसार इनोव्हेटिव्ज नावाचा सामाजिक उद्योग सुरू केला. झोपडपट्टीतील ग्रामीण भागातील मुली आणि बायकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देता देता त्यांचे काम वाढत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हा त्यांचा हेतू आहे.
advertisement
9/9
रक्षाबंधनाच्या काही महिने आधी या महिलानी राख्या बनवण्याच्या कामाला सुरुवात केली होती . त्या बांबूच्या राख्यांचे काम घरूनही करतात. या राख्यांना देशविदेशातून मागणी आहे. इंग्लंड, स्वीडन, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स आणि स्वित्झलँड अशा देशांत बांबूच्या राख्या पोहोचल्या आहेत. स्वित्झर्लंडच्या सुनीता कौर यांनी मीनाक्षी यांच्या बांबू राखीसह इतरही वस्तू तेथे विक्रीकरता मागवल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/चंद्रपूर/
आदिवासी महिलांनी घडवल्या अप्रतिम कलाकृती; 'बांबू लेडी'ची जगभर चर्चा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल