Marathwada Weather: मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता नवीन संकट, पाहा हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
advertisement
1/5

राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी आज 8 सप्टेंबर रोजी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा कुठलाही अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. जालना आणि बीड जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये ढग दाटून येणार असून या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर धाराशिव जिल्ह्यातही थोड्या प्रमाणात रिमझिम किंवा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात ऑगस्टमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता मात्र हवामानात काही बदल होत असल्याने पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. हवामानाच्या बदलामुळे नागरिक आजारी पडू लागले त्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
advertisement
5/5
पावसाचा जोर कमी अधिक होत आहे यामुळे वातावरण स्थिर नाही अनेक आजारांची उत्पत्ती होत आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील पिकांचे योग्य ते नियोजन करावे, आज सोमवार रोजी मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही. हवामानाचा चढ-उताराचा खेळ सुरू असल्यामुळे पुन्हा उद्या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, आता नवीन संकट, पाहा हवामान अपडेट