Weather Alert: शनिवारचा दिवस धो धो पावसाचा! मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना हायअलर्ट, 24 तास धोक्याचे!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
advertisement
1/5

राज्यात कोकण, घाटमाथ्यासह काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात देखील पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. हवामानात मोठे बदल जाणवत असून आज 26 जुलै रोजी मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर एका जिल्ह्याला यलो अलर्ट असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
आज 26 जुलै रोजी मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी दक्षतेचा इशारा दिला आहे. आज बीडमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून बीडला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा जोर ओसरला होता, काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. मात्र या 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
advertisement
5/5
दरम्यान, आज मराठवाड्यातील 8 पैकी 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर बीडला यलो अलर्ट दिला आहे. 24 तासानंतर मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार असून पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान विबआगे दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: शनिवारचा दिवस धो धो पावसाचा! मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना हायअलर्ट, 24 तास धोक्याचे!