TRENDING:

Marathwada weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
1/5
पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असून, उत्तर महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यात देखील थंडीची लाट कायम आहे. 17 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांना थंड लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्याला शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशतः काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/5
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला देखील शीतलहरीचा इशारा दिला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी वाढणार आहे. नांदेडमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच साधारणतः येथे वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे, अशीच स्थिती पुढे काही दिवस राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना कुठलाही सतर्कतेचा अलर्ट देण्यात आला नाही, मात्र येथील हवामान कोरडे राहणार असून काही प्रमाणात थंडी असणार आहे. तसेच लातूरमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहू शकते. सतत कमी होत असलेल्या तापमानामुळे या भागांतही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
5/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड अशा एकूण सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून याकाळात थंडीच्या लाटीचा इशारा पुढील 24 तासांसाठी देण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत थंडीचा जोर अधिक वाढला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, 6 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल