Marathwada Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून, विजा आणि जोरदार वाऱ्यांचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि उकाड्याने नागरिक त्रस्त असतानाच, भारतीय हवामान खात्याने आता 7 ऑगस्ट रोजी पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून, विजा आणि जोरदार वाऱ्यांचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
advertisement
3/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारनंतर वातावरण अधिकच ढगाळ होईल आणि संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहू शकतो.
advertisement
4/5
त्यामुळे विजेचा पुरवठा, वाहतूक आणि दळणवळण यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काढणीयोग्य पिके वेळेत गोळा करावीत, शेतात पाणी साचू नये यासाठी जलनिकासीची योग्य व्यवस्था करावी आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
5/5
या हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढू शकतो, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. बीड, लातूर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानाशी संबंधित अधिकृत अपडेट्ससाठी नागरिकांनी IMD च्या अधिकृत संकेतस्थळावरून या संदर्भातील माहिती घेत राहावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, 8 जिल्ह्यांना अलर्ट