Marathwada Rain : मराठवाड्यात पुन्हा हवापालट, आज मुसळधार की उघडीप? हवामान विभागाकाडून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
मराठवाड्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः नद्या नाल्यांना पूर आला.
advertisement
1/7

राज्यात गेल्या 48 तासांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. तसेच मराठवाड्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः नद्या नाल्यांना पूर आला. गेली 2 ते 3 दिवस संततधार पावसाने शेतातील कोमजलेल्या पिकांना जीवनदान दिले.
advertisement
2/7
मात्र काही ठिकाणी पिके पाण्याखाली देखील गेले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने हवा पलटली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आज 28 जुलै रोजी तसेच पुढील 24 तास हवामानाची काय परिस्थिती असणार आहे याचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
3/7
रविवारपासून हवामानात काही महत्त्वाचे बदल जाणवत असल्याने पावसाची शक्यता कमी आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सतर्कतेचा कुठलाच अलर्ट हवामान विभागाने दिला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, त्यामुळे ढगांचा गडगडाट देखील होण्याची शक्यता आहे. उर्वरित जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका पाऊस असणार आहे.
advertisement
4/7
जालन्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवस झालेल्या संतत धार आणि काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे बदनापूर तालुका झोडपून काढला. त्यामुळे मात्रेवाडी शिवारातील शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाणी साचलेले शेत आहे की तळे आहे हे कळणे सुद्धा कठीण झाले होते.
advertisement
5/7
पाणी साचल्याने शेतातील कपाशीची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे कपाशीची पाने पिवळी पडायला लागली आणि सुकायला देखील त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक मोठा फटका बसणार आहे. आर्थिक फटका बसल्याने सरकारने अनुदान देऊन कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली.
advertisement
6/7
जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणाचा साठा 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. आवक 14 हजार 803 क्युसेक आहे, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मागील महिनाभरात धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. साठा 29 टक्क्यांवरून थेट 81 टक्क्यांवर गेला आहे. याच वेगाने पाणी येत राहिल्यास पुढील दोन दिवसांत कोणत्याही क्षणी मुख्य गेट्समधून विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे नदीच्या पात्रात कोणीही उतरू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
advertisement
7/7
गेल्या 3 दिवसात मराठवाड्यात रिमझिम पाऊस तर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. आता मात्र हवामानात बदल झाल्याने पावसाने उघडीत दिली असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असा अंदाज हवामाना विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी शेती कामांचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्याला कुठलाही सतरतेचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain : मराठवाड्यात पुन्हा हवापालट, आज मुसळधार की उघडीप? हवामान विभागाकाडून महत्त्वाचं अपडेट