TRENDING:

Marathwada Rain: विजांचा कडकडाट होणार, 24 तासात पाऊस येणार, मराठवाड्यातील हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात मान्सूनने उघडीप दिली असून शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
विजांचा कडकडाट होणार, 24 तासात पाऊस येणार, मराठवाड्यातील हवामान अंदाज
गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्यानंतर मराठवाड्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज 15 जुलै रोजी मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच कोणत्याही जिल्ह्याला आज सतर्कतेचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
advertisement
2/5
मराठवाड्यात पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पण संभाजीनगरला आज पावसाचा कोणातही इशारा देण्यात आलेला नाही. चांगल्या पावसासाठी पुढील आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
3/5
परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. 15 जुलै रोजी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना देखील आज कोणत्यही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. या ठिकाणी देखील आज, मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाभर हवामान स्थिती काय राहणार असून पुन्हा पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
गेल्या काही काळात मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील काही काळ हवामानाची स्थिती कायम राहणार असून शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: विजांचा कडकडाट होणार, 24 तासात पाऊस येणार, मराठवाड्यातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल