TRENDING:

Marathwada Rain: विजा कडाडणार, बीड, लातूरला पाऊस होणार, 16 जुलैचा मराठवाड्यातील हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/4
विजा कडाडणार, बीड, लातूरला पाऊस होणार, 16 जुलैचा मराठवाड्यातील हवामान अंदाज
छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात मंगळवारी दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत 21.4 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. त्याचबरोबर शहरात सकाळी 8.30 पर्यंत 3 मिमी पाऊस पडला. दरम्यान, बुधवारीही शहरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/4
जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. या ठिकाणी तापमान हे 33 अंश वर गेलं असून पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/4
बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज सतर्कतेचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, आज या ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/4
दरम्यान, मराठवाड्यातील शेतकरी गेल्या काही काळापासून पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पुढील काही दिवस पावसाचा कोणताही अलर्ट नसला तरी आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे खरीप पीके लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: विजा कडाडणार, बीड, लातूरला पाऊस होणार, 16 जुलैचा मराठवाड्यातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल