Photo: भीमा नदीत 20 फुटांची मगर, पंढरपूरमध्ये खळबळ, शेतकऱ्यांमध्ये दहशत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भीमा नदीत पंढरपूर तालुक्यात 20 फुटाची मगर आढळून आली आहे. उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर मगर आढळून आलीये. मगरीचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
advertisement
1/5

पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जवळ भीमा नदीमध्ये एक मोठी 20 फुटाची मगर आढळून आली आहे.
advertisement
2/5
सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे.
advertisement
3/5
अशातच पिराची कुरोली बंधारा नजीक एक मोठी मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
4/5
आसपासच्या शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाच्या माध्यमातून या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. तसेच मंदिर परिसरात मगर आली तर काय करायचं? असा सवालही भाविक विचारीत आहेत.
advertisement
5/5
भीमा नदीमध्ये प्रथमच मगर दिसून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करतायेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo: भीमा नदीत 20 फुटांची मगर, पंढरपूरमध्ये खळबळ, शेतकऱ्यांमध्ये दहशत