TRENDING:

शिंदेंच्या आमदाराच्या घरी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चांदीची तलवार देऊन सत्कार

Last Updated:
आमदार राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला.
advertisement
1/5
शिंदेंच्या आमदाराच्या घरी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चांदीची तलवार देऊन सत्कार
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नवदांपत्य पुष्कराज क्षीरसागर आणि पूजा क्षीरसागर यांना विवाह निमित्त शुभेच्छा दिल्या.
advertisement
2/5
आमदार राजेश क्षीरसागर हे १९८६ पासून शिवसेना पक्षात काम करतात. कोल्हापुरातील जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी क्षीरसागर यांनी संघर्ष केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य आणि विकासात्मक कामात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्याचे कौतुक केले.
advertisement
3/5
त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत त्यांची दोन्ही मुले ऋतुराज क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर हेही समाजकार्यात सहभागी झाले आहेत. युवकांनी समाजकार्यासह राजकारणात पुढे येणे गरजेचे असून, ऋतुराज आणि पुष्कराज यांच्या भावी वाटचालीस फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या
advertisement
4/5
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांदीची तलवार, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
advertisement
5/5
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
शिंदेंच्या आमदाराच्या घरी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चांदीची तलवार देऊन सत्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल