TRENDING:

Dhananjay Munde : 'मला 2 मिनिटंही बोलता येईना...'; धनंजय मुंडेंना झालेला दुर्मीळ आजार Bell’s palsy नक्की आहे तरी काय?

Last Updated:
What is Bell's palsy disease : धनंजन मुंडे यांनी गुरुवारी ट्वीट करत आपल्य दुर्मीळ आजाराबद्दल सांगितलं, त्यानंतर याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे, हा आजार नक्की काय आहे? असा प्रश्न देखील उपस्थीत केला जात आहे.
advertisement
1/8
धनंजय मुंडेंना झालेला दुर्मीळ आजार Bell’s palsy नक्की आहे तरी काय?
धनंजन मुंडे यांनी गुरुवारी ट्वीट करत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल सागितले. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांना झालेल्या दुर्मीळ आजाराबद्दल सांगितले आहे. ज्यामुळे त्यांना नीट दोन मिनिट देखीत बोलता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
2/8
ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलं, ''माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.''
advertisement
3/8
पुढे धनंजय मुंडे यांनी लिहिलं, ''आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. ''
advertisement
4/8
यामुळे मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल असं देखील ते म्हणाले.
advertisement
5/8
पण हा Bell's palsy आजार म्हणजे नक्की काय आहे? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. चला या आजाराबद्दल थोडी माहिती घेऊ. बेल्स पाल्सी या आजारा मराठीत अर्ध्या चेहऱ्यावरुन वारे जाणं असं म्हणतात.
advertisement
6/8
बेल्स पाल्सी ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू अचानक कमकुवत होतात किंवा लकवा मारतो. याचं मुख्य कारण म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रण करणाऱ्या नसांमध्ये आलेली समस्या.
advertisement
7/8
बेल्स पाल्सीची लक्षणं:चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक लकवा येणेडोळा मिटवता न येणे किंवा पाणी येणेतोंड एकाच बाजूला वाकडं होणंबोलताना किंवा खाताना त्रास होणंकानात आवाजांचा त्रास किंवा संवेदनशीलता वाढणे
advertisement
8/8
बेल्स पाल्सी बहुतेक वेळा काही आठवड्यांत बरी होऊ शकते, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Dhananjay Munde : 'मला 2 मिनिटंही बोलता येईना...'; धनंजय मुंडेंना झालेला दुर्मीळ आजार Bell’s palsy नक्की आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल