जय भवानी, जय शिवाजी... शिवजयंतीनिमित्त तुळजापूर मंदिरात पार पडली खास महापूजा! PHOTOS
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Shiv Jayanti 2025: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ठिकठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या थाटात महाराजांची मिरवणूक काढतात. तसंच महाराजांच्या गड-किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता करून आनंद साजरा केला जातो.
advertisement
1/5

आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची 'भवानी तलवार अलंकार महापूजा' पार पडली. या पूजेमुळे मंदिराच्या अत्यंत प्रसन्न वातावरणात आणखी भर पडली.
advertisement
2/5
आज मंदिरात छत्रपती शिवरायांना तुळजाभवानीनं स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिल्याचा भव्य देखावा साकारण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तसंच देवीच्या गाभ्याऱ्यास गड-किल्ल्यांचं रूप रेखाटण्यात आलं होतं.
advertisement
3/5
छत्रपती शिवरायांना तुळजाभवानीनं भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीची उत्सव विशेष पूजा पार पाडली जाते.
advertisement
4/5
छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं नातं अतूट आहे. राज्यातील 3 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत.
advertisement
5/5
छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ हे तुळजाभवानीवरील अपार श्रद्धेचं प्रतीक असल्याचंही सांगितलं जातं. छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानीनं भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. तुळजाभवानी मंदिरात 2 प्रवेशद्वार आहेत, त्यांना छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची नावं देण्यात आली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
जय भवानी, जय शिवाजी... शिवजयंतीनिमित्त तुळजापूर मंदिरात पार पडली खास महापूजा! PHOTOS