Weather Update: महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 6 दिवस मुसळधार कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषत: मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुके देखील पावसाने झोडपून काढले आहे. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7

डॉ. के. एस. होसाळीकर हे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) माजी प्रमुख आणि अनुभवी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी पुणे वेधशाळेचे प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. हवामानविषयक अंदाज सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेल्या नवीन पोस्टमुळे जनतेच्या काळजात धस्स झालं आहे.
advertisement
2/7
डॉ. होसाळीकर यांच्या पोस्टनुसार, येत्या 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर जास्तच राहिल. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो देखील जोडले आहेत.
advertisement
3/7
डॉ. होसाळीकर यांच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाचा प्रभाव राहील. 2 ते 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाची हालचाल होत राहिल. पावसाच्या पॅटर्नमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
advertisement
4/7
हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी राज्यात पुन्हा अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट असून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाचही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शेतीमाल आणि पशुधनाचं प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
7/7
अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. डॉ. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर या परिस्थितीतून सावरण्याची संधी देखील मिळणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 6 दिवस मुसळधार कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट