"सापाला किस कर...", दिग्दर्शकाची विचित्र मागणी ऐकून भडकली अभिनेत्री, सेटवरच केला तमाशा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. पण, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक खूपच मजेशीर आणि धक्कादायक किस्सा घडला होता.
advertisement
1/8

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटांमध्ये ‘गाइड’ या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या चित्रपटात अभिनेत्री वाहिदा रेहमानने साकारलेली ‘रोजी’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
2/8
पण, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक खूपच मजेशीर आणि धक्कादायक किस्सा घडला होता, ज्याबद्दल खुद्द वाहिदा रेहमान यांनीच खुलासा केला आहे.
advertisement
3/8
‘गाइड’ हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बनला होता. इंग्रजी व्हर्जनचं दिग्दर्शन टॅड डॅनियलवस्कीने केलं होतं.
advertisement
4/8
वाहिदा रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “‘गाइड’मधील माझा आवडता डान्स ‘सपेरे का डान्स’ आहे. जेव्हा इंग्रजी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा दिग्दर्शकाने मला म्हटलं, ‘तू नाचता-नाचता सापाच्या फणाला किस कर.’”
advertisement
5/8
वाहिदा यांना आधी वाटलं की तो मस्करी करत आहे. पण, तो खरंच तसं बोलत होता. तो म्हणाला, “तू भारतीय मुलगी आहेस, तू असं का करू शकत नाहीस?” यावर वाहिदा संतापल्या आणि म्हणाल्या, “भारतीय असण्याचा अर्थ असा नाही की आम्ही सापांसोबत खेळतो.”
advertisement
6/8
यावरून दोघांमध्ये खूप वाद झाला. वाहिदा त्याला समजावत होत्या की, सापाला पकडणं आणि त्याला किस करणं यात खूप फरक आहे. थोड्या वेळाने सेटवर अफवा पसरली की, साप पिंजऱ्यातून बाहेर पळाला आहे. हे ऐकून दिग्दर्शक सर्वात आधी सेट सोडून पळाला.
advertisement
7/8
जेव्हा तो परत आला, तेव्हा वाहिदाने त्याला विचारलं, “तुम्ही का पळालात?” त्यावर तो म्हणाला, “मला सापाची भीती वाटते.” तेव्हा वाहिदा म्हणाल्या, “तुमच्याप्रमाणेच मलाही सापाची भीती (Fear) वाटते.” त्यानंतर दिग्दर्शकाला त्याची चूक समजली आणि त्याने तो सीन काढून टाकला.
advertisement
8/8
‘गाइड’ हा चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो खूप सुपरहिट ठरला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"सापाला किस कर...", दिग्दर्शकाची विचित्र मागणी ऐकून भडकली अभिनेत्री, सेटवरच केला तमाशा