बुलडाणा: बुलडाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खामगाव शहरात एका हॉटेलमध्ये प्रेमी युगुलांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलमध्ये घुसून दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जुगनू हॉटेलमध्ये दोघांचा खून
पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील खामगाव शहरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खामगाव शहरातील जुगनू हॉटेलमध्ये दोघांचा खून झाला आहे. एक तरुणी आणि तरुणाचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला आहे. घटनास्थळावर आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे तीन जणांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
छातीवर आणि हातावर चाकूचे वार
खामगाव शहरातील चिखली बायपास भागातील जुगनू हॉटेल वरील एका खोलीत युवती आणि खोलीच्या बाजूला युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत युवक बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावातील असून सोनू उर्फ साहिल राजपूत असे त्याचे नाव आहे. तर युवती साखरखेर्डा गावाला लागूनच असलेल्या शिंदी गावातील असून ऋतुजा पद्माकर खरात असं मृत युवतीच नाव आहे. मृत युवतीच्या गळ्यावर छातीवर आणि हातावर चाकूचे वार केले असल्यास आढळून आले आहेत तर मृत युवकाच्या छातीवर तीन घाव असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वतःच्या छातीत तीन वेळा चाकूचे वार
प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडलं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आधी साहिलने ऋतुजावर चाकू नये सपासप वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या छातीत तीन वेळा चाकू बॉक्सून घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जातोय. जुगनू हॉटेलवर प्रवेश मिळवताना साहिलने साखरखेर्डा गावातीलच एका युवतीचे आधार कार्ड दिले असल्याने सुरुवातीला ही युवती साखरखेर्डा येथील असावी असा समज पोलिसांसह सर्वांचा झाला होता मात्र आधार कार्ड मिळालेली युवती ही आपल्या घरी सुखरूप असल्याने मृत पावलेली युवती नेमकी कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता.
हत्या का आणि कुणी केली?
हॉटेलमध्ये घटना घडल्यानंतर तातडीने खामगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हॉटेलमध्ये प्रेमी युगुलांची हत्या का आणि कुणी केली, याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, शहरातील एका हॉटेलमध्ये तरुण आणि तरुणीचा खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
