मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका कॉलेजमध्ये पीडिता नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी आली. कल्याण परिसरात ती आपल्या आईसोबत राहत होती. याच दरम्यान या मुलीची इंस्टाग्रामवर राहुल भोईर नावाच्या नराधमाशी झाली. हळूहळू ओळखीचं रुपांतर हे प्रेमात झालं. पीडितेचा फायदा घेत राहुल भोईर याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी संबंध प्रस्तापित केले. ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती. नराधम राहुल भोईरने पीडितेसोबतचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर या नराधमाने हा व्हिडीओ त्याचा मित्र देवा पाटील याला पाठवला. देवा पाटील याने थेट पीडितेशी संपर्क साधला आणि तिला ब्लॅकमेल करू लागला.
advertisement
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पीडिता हादरून गेली होती. आरोपी देवा पाटील याने तिच्यावर दबाव टाकला आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारामुळे पीडित हादरून गेली होती. पण हा प्रकार इथं थांबला नाही. या आरोपींनी तिचे व्हिडीओ पुढे त्यांचे मित्र आरोपी अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे या नराधमांना पाठवला. हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणार आहे. श्रीमंत घरातील ही पोरं आहे. त्यांनी पीडितेला पुन्हा ब्लॅकमेल केलं. व्हिडीओ व्हायरल न करण्याची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी केली. त्याानंतर या आरोपी तिच्यावर अत्याचार केले.
पीडित मुलगी गर्भवती
या ८ नराधमांनी पीडितेवर वारंवार अत्याचार केले. ८ जणांनी तिच्या शरिराचे लचके तोडले. या अत्याचारामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला होता. यात ती गर्भवती राहिली होती. पण या नराधमांनी गर्भपात सुद्धा केला होता. या पीडितेसोबत या नराधमांनी ५ महिने अत्याचाराचा कळस केला.
प्रकरण कसं समोर आलं?
राहुल भोईर, देवा पाटील, अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे या नराधमांनी पीडितेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे व्हिडीओ जेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले तेव्हा सगळ्यांना जबर धक्का बसला. त्यांनी पीडितेला घेऊन थेट कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं. या आठही नराधमांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले.
30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
सर्व आरोपींना आज मंगळवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आरोपींना ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल आणि गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. ती न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.