OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Coutroom Drama Movies On OTT: ओटीटीवर एकापेक्षा एक हटके सिनेमे-सीरीज रीलीज होत असतात. नुकताच 'जॉली एलएलबी 3; रिलीज झालाय. अशा प्रकारचे कोर्ट ड्रामा सिनेमे-सीरीज कोण-कोणते आहेत जाणून घेऊया.
advertisement
1/8

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला "जॉली एलएलबी 3" प्रेश्रकांच्या पसंतीस उतरत आहे. याआधीही अनेक प्रभावी कोर्ट ड्रामा चित्रपट बनवण्यात आले आहेत. तुम्ही हे चित्रपट ओटीटीवर पाहू शकता. यातीलच काही सिनेमांवर नजर टाकूया.
advertisement
2/8
जय भीम: दक्षिणेतील स्टार सूर्या अभिनीत हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात, अभिनेत्याने एका वकिलाची भूमिका केली होती जो एका गरीब पार्श्वभूमीतील निष्पाप माणसाला न्यायालयात न्याय मिळवून देतो ज्यावर चोरीचा खोटा आरोप आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
3/8
पिंक: बॉलीवूडमधील सर्वोत्तम कोर्टरूम ड्रामांपैकी एक हा सिनेमा आहे. तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी आणि अँड्रिया तारियांग यांच्या पात्रांभोवती फिरतो. चित्रपटात अमिताभ बच्चन एका वकिलाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
advertisement
4/8
सेक्शन 375: अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांचा हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात एका ज्युनियर कॉस्च्युम असिस्टंटला चित्रपट दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप करताना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स मनाला चटका लावणारा आहे. अक्षय खन्नाचा हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
5/8
मुल्क: अनुभव सिन्हा दिग्दर्शित हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याची कथा एका मुस्लिम कुटुंबावर आधारित आहे ज्याचा तरुण सदस्य दहशतवादाच्या मार्गावर जातो. ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि आशुतोष राणा यांसारख्या दमदार कलाकारांनी "मुल्क" मध्ये काम केलंय. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.
advertisement
6/8
सिर्फ एक बंदा काफी है: मनोज बाजपेयी वकील पीसी सोलंकीची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात एका अल्पवयीन मुलीवर धार्मिक नेत्याकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे दाखवले आहे आणि नंतर पीसी सोलंकी पीडितेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा कोर्टरूम ड्रामा तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.
advertisement
7/8
जन गण मन: हा मल्याळम चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. पृथ्वीराज सुकुमारन आणि सूरज वेंजरामुडू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला तुम्ही नायक समजता तोच खरा खलनायक ठरतो. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
advertisement
8/8
नेरू: 21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला कोर्टरूम ड्रामा चित्रपट "नेरू". सुपरस्टार मोहनलाल यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. दक्षिणेतील अभिनेत्री प्रियामणी देखील या चित्रपटाचा भाग होती. जर तुम्हाला हा चित्रपट पहायचा असेल तर तो सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा