TRENDING:

Godavari River Flood: आभाळ फाटलं, गोदामाईचं पहिल्यांदाच रौद्ररूप; बीडमधील काळीज धस करणारे 7 PHOTOS

Last Updated:
बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः दमदार हजेरी लावली. सलग काही तासांच्या पावसामुळे गावोगाव पाणी साचले असून, शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
advertisement
1/7
आभाळ फाटलं, गोदामाईचं पहिल्यांदाच रौद्ररूप; बीडमधील काळीज धस करणारे 7 PHOTOS
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्र तुडुंब भरल्याने पाणी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घुसले. शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. गावोगावी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मोगरा या गावचे शेतकरी तुकाराम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील पिके ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत.
advertisement
2/7
बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर दिसून येते. गेवराई, माजलगाव, मंजरथ आणि मोगरा या भागांमध्ये तर अक्षरशः पाण्याने धुमाकूळ घातला आहे. शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग यांसारखी खरीप पिके पूर्णपणे जलमग्न झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी तलावासारख्या दिसत आहेत. मेहनतीने उभं केलेलं पीक वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांना हताश व्हावं लागत आहे.
advertisement
3/7
गोदावरी जलाशयातील पाणी वाढल्याने आसपासच्या भागातील शेतांमध्ये पाणी घुसले आहे. नद्यांच्या पाण्याचा जोर इतका होता की शेतातील बांध तुटून वाहून गेले.
advertisement
4/7
त्यामुळे पिकांचेच नव्हे तर जमिनीच्या सुपीक थराचेही मोठे नुकसान झाले आहे. पुढील हंगामावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
5/7
पुरामुळे केवळ पिकांचे नुकसान नाही तर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता उभ्या पिकांवरून हात धुवून बसला आहे.
advertisement
6/7
जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. गावोगावी शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून, शेतात गेलेले पाणी लवकर ओसरावे अशी अपेक्षा आहे.
advertisement
7/7
या परिस्थितीत प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी होत आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. गोदावरी नदीच्या पुरामुळे निर्माण झालेली स्थिती किती दिवस कायम राहील, याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. शेतकरी मात्र आपल्या हंगामाची वाट लागल्याने खोल चिंतेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Godavari River Flood: आभाळ फाटलं, गोदामाईचं पहिल्यांदाच रौद्ररूप; बीडमधील काळीज धस करणारे 7 PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल