"अरे, माहिती नाही पायाचा इतका वास का येतोय...?" असं म्हणून आपण विषय टाळतो खरा, पण हा प्रश्न कधी ना कधी तुम्हालाही पडला असेलच. बुटातून पाय बाहेर काढल्यावर येणारी ती दुर्गंधी केवळ पुरुषांच्याच पायाला जास्त का येते? क्वचितच हे कोणा महिलांच्या पायाला येतं? चला यामागचं सायन्स समजून घेऊ.
पायांना दुर्गंधी का येते?
advertisement
पायांच्या दुर्गंधीचं मुख्य कारण म्हणजे 'घाम'. आपल्याला वाटतं की काकेत किंवा कपाळावर जास्त घाम येतो, पण वास्तवात आपल्या पायाचे तळवे शरीराच्या इतर भागांपेक्षा कितीतरी पटीने जास्त घाम बाहेर टाकत असतात. हा घाम जेव्हा तुमच्या पायावरील बॅक्टेरियांच्या (Bacteria) संपर्कात येतो, तेव्हा त्यातून ही उग्र दुर्गंधी निर्माण होते.
तळव्यांमधून इतका घाम का येतो?
आपल्या शरीराची रचना ही निसर्गाचा एक चमत्कार आहे. 'इंटरनॅशनल हायपरहायड्रोसिस सोसायटी'च्या मते, मानवी शरीरात साधारणपणे 2 ते 4 लाख 'स्वेट ग्लँड्स' (घाम ग्रंथी) असतात. यापैकी बहुतांश "एक्राइन" (Eccrine) ग्रंथी असतात, ज्या प्रामुख्याने हाताचे तळवे, पायांचे तळवे, कपाळ आणि गालांवर सर्वाधिक प्रमाणात आढळतात.
जेव्हा तुम्ही बराच वेळ घट्ट बूट आणि मोजे घालून असता, तेव्हा या घामाला बाहेर पडायला जागा मिळत नाही. बंदिस्त जागेत बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते आणि मग बूट काढताच तो 'वास' संपूर्ण खोलीत पसरतो.
मग महिलांच्या पायांचा वास का येत नाही?
हा प्रश्न प्रत्येक पुरुषाला पडतो. स्वेट ग्लँड्स तर दोघांनाही असतात, मग हा भेदभाव का? यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत.
1. ग्रंथींची रचना: वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर, महिलांच्या पायात असलेल्या स्वेट ग्लँड्सपैकी बहुतांश ग्रंथी या नैसर्गिकरित्या 'बंद' किंवा कमी सक्रिय असतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या पायाला कमी घाम येतो आणि पर्यायाने दुर्गंधीची समस्याही कमी असते. 2. स्वच्छतेची सवय: शारीरिक रचनेसोबतच स्वच्छतेचा भागही महत्त्वाचा आहे. पुरुष अनेकदा एकाच मोज्यांचा जोडी अनेक दिवस वापरतात किंवा ओले बूट घालतात. याउलट, महिला आपल्या शरीराची आणि पायांच्या स्वच्छतेची (उदा. पेडिक्युअर, नियमित धुणे) पुरुषांच्या तुलनेत जास्त काळजी घेतात.
दुर्गंधी टाळण्यासाठी काय कराल?
दररोज स्वच्छ आणि सुती (Cotton) मोजे वापरा.
दिवसभर बूट घालून न राहता अधूनमधून पाय मोकळे सोडा.
अंघोळीच्या वेळी पायांची बोटं आणि नखं नीट घासुन स्वच्छ करा.
तुमच्या पायांचा वास येणं ही काही लज्जास्पद गोष्ट नाही, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त थोडी काळजी घेतली तर तुम्ही आणि तुमचे मित्रही सुटकेचा निश्वास सोडू शकतील.
