TRENDING:

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात! अवजड ट्रकला धडकल्या 3 गाड्या

Last Updated:
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळ तवा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात, चालक किरकोळ जखमी, वाहतूक कोंडी, पोलिसांनी वाहने हटवून मार्ग मोकळा केला.
advertisement
1/5
मुंबई-अहमदाबाद हायवेवर 4 वाहनांचा विचित्र अपघात! अवजड ट्रकला धडकल्या 3 गाड्या
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळच्या तवा येथे आज (१२ डिसेंबर) चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. एका अवजड वाहनाने अचानक ब्रेक घेतल्यामुळे, मागून वेगाने येणारी तीन वाहने एकमेकांना धडकली आणि थेट त्या अवजड ट्रकला जाऊन आदळली.
advertisement
2/5
या विचित्र अपघातात एकूण चार वाहनांचा समावेश होता. ज्या वाहनाने अचानक ब्रेक घेतला, तो एक अवजड ट्रक होता. या ट्रकला मागून येणाऱ्या दोन ट्रकसह एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका मोठा होता की, त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले.
advertisement
3/5
सुदैवाने, या अपघातात फक्त चालक किरकोळ जखमी झाले आहेत. कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातात झालेल्या नुकसानीमुळे आणि रस्त्यावर वाहने थांबल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
advertisement
4/5
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या तवा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. अवजड वाहनाने अचानक ब्रेक घेतल्याने मागून येणारी तीन वाहन अवजड ट्रकला धडकली . अपघातात तीन ट्रकसह एका कारचा समावेश.चालक किरकोळ जखमी.
advertisement
5/5
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू केले. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागला, मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी सुरक्षित अंतर राखावे आणि वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात! अवजड ट्रकला धडकल्या 3 गाड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल