Independence Day 2024 : देशप्रेमाची ज्योत कायम पेटत राहिली पाहिजे; मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहन केलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
advertisement
1/5

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला वंदन करून भारतमातेचा जयघोष केला. तसेच पोलीस बांधवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
advertisement
2/5
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान त्यांना शुभेच्छा दिल्या. हर घर तिरंगा 9 तारखेपासून आपण साजरा करत आहोत. देशप्रेमाची ज्योत कायम पेटत राहिली पाहिजे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
advertisement
3/5
मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, देशातील प्रत्येक घटकाचा विकास ही आपली जबाबदारी आहे. सर्व समाजाचा विकास म्हणजे स्वातंत्र्य. देशाच्या नकाशात गेल्या 2 वर्षात आपण नाव कोरलंय. दुर्बल घटकंसाठी, महिलांसाठी कल्याणकारी योजना आपण नोंदवत आहोत.
advertisement
4/5
पंतप्रधान देखील आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. 2047 मध्ये भारताचे स्थान कसं असावं यांचा रोडमॅप पंतप्रधान मोदींनी सुरु केला आहे. अर्थव्यवस्था आधीसारखी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
advertisement
5/5
आधीच्या सरकारने काय केलं हे मी आज बोलणार नाही. नवीन धोरणांची अंबलबजावणी सुरु झाली आहे. लॉजिस्टिक पॉलिसी सुरू करणार आहोत. त्यासाठी 30 हजार कोटींचा महसूल मिळणारं आहे. GDPमध्ये 14% वाटा महाराष्ट्रचा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Independence Day 2024 : देशप्रेमाची ज्योत कायम पेटत राहिली पाहिजे; मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा