TRENDING:

50 वर्षांच्या स्मृती ईराणी दिसू लागल्या विशीतली तरुणी, Before After Look पाहून विश्वास बसणार नाही PHOTOS

Last Updated:
Smriti Irani Weight Loss Secret : स्मृती ईराणी यांनी वयाच्या 50 व्या वर्षी सहा महिन्यांत 27 किलो वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
advertisement
1/7
50 वर्षांच्या स्मृती ईराणी दिसू लागल्या विशीतली तरुणी, पाहा PHOTOS
'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतील 'तुलसी बहू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या स्मृती ईराणी सध्या चर्चेत आहेत. अभिनयासह राजकारणात पाऊल ठेवलेल्या स्मृती ईराणी यांनी 'फॅट टू फिट' होत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
advertisement
2/7
स्मृती ईराणी यांचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्मृती ईराणी यांनी फक्त बॅलेंस्ड लाईफस्टाईलच्या माध्यमातून वजन कमी केलं आहे.
advertisement
3/7
स्मृती ईराणी यांनी आपल्या लाइफस्टाईलमध्ये काही बदल केले आहेत. योग्य आहार, योग आणि चालणे या गोष्टींचा समतोल साधत त्यांनी वजन कमी केलंय.
advertisement
4/7
स्मृती ईराणी यांनी खाण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आहे. ग्लूटन आणि डेअरी फ्री डाएटचा त्यांनी अवलंब केला आहे. गहू आणि दूधापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांना त्यांनी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकलं आहे.
advertisement
5/7
स्मृती ईराणी आपल्या नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या आपल्या आहारत अंडी, दाळ, पनीर आणि चिया सिड्स सारख्या हेल्दी पदार्थ खातात.
advertisement
6/7
स्मृती ईराणी यांनी व्यायामावरदेखील भर दिला आहे. त्यांच्या फिटनेस रुटिनचा योग हा महत्त्वाचा भाग आहे. शरीर लवचिक होण्यासाठी, तनाव कमी करण्यासाठी योग फायदेशीर असल्याचं त्या सांगतात. तसेच त्या नियमित वॉकदेखील करतात.
advertisement
7/7
स्मृती ईराणी यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे की कोणत्याही वयात तुम्ही तुमचं फिटनेस सांभाळू शकता. स्मृती ईराणी यांच्यावर सध्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
50 वर्षांच्या स्मृती ईराणी दिसू लागल्या विशीतली तरुणी, Before After Look पाहून विश्वास बसणार नाही PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल